राज्यात पुन्हा सापडला एमडी ड्रग्सचा कारखाना, ड्रग्सचे मोठे रॅकेट उद्धवस्थ

| Updated on: Oct 28, 2023 | 2:26 PM

Crime News | ललित पाटील प्रकरणानंतर राज्यात एसडी ड्रग्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. ललित पाटील याचा नाशिकमध्ये ड्रग्स कारखाना सापडला होता. त्यानंतर छत्रपती संभाजी नगरात ड्रग्सचा कारखाना मिळाला. आता हे प्रकरण सोलापूरपर्यंत पोहचले आहे.

राज्यात पुन्हा सापडला एमडी ड्रग्सचा कारखाना, ड्रग्सचे मोठे रॅकेट उद्धवस्थ
Drug Racket file photo
Follow us on

चंदन पुजाधिकारी, नाशिक | 28 ऑक्टोंबर 2023 : ससून रुग्णालयातून ललित पाटील याचे ड्रग्स प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर एमडी ड्रग्स बनवणारे नाशिक आणि संभाजी नगरमधील कारखाने गेल्या काही दिवसांत पोलिसांना मिळाले. त्याठिकाणी एमडी ड्रग्सचा मोठा साठा मिळाला होता. आता सोलापूरमध्येही एमडी ड्रग्सचा कारखाना नाशिक पोलिसांना मिळाला. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मिळून आले. सोलापूरमध्ये एमडी ड्रग्सचा कारखाना सुरू असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सोलापूरच्या मोहोळ एमआयडीसीमधील कारखान्यावर नाशिक पोलिसांनी कारवाई केली. कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि कच्चामाल पोलिसांनी जप्त केला.

नाशिकमधून तीन पथके पोहचली

नाशिक पोलिसांच्या तीन पथकांनी सोलापूरमध्ये जाऊन कारवाई केली. कारखान्यात एमडी ड्रग्स आणि ड्रग्ससाठी लागणारा कच्चामाल पोलिसांनी जप्त केला. या ठिकाणी 10 कोटींचे ड्रग्स मिळाले आहे. तसेच आठ जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत. यासंदर्भात बोलताना नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी 12.5 ग्राम एमडी सापडले होते. त्या प्रकरणाचा तपास करत असताना काही आरोपींना अटक केली होती. सनी पगारे, अर्जुन पिवल, मनोज गांगुर्डे, सुमित पगारे यांना अटक झाली. त्यांच्याकडून पाच किलो एमडी ड्रग्ज मिळाले होते.

सोलापूरमध्ये पोहचले पथक

नाशिक पोलिसांनी आरोपींची चौकशी केली. त्यानंतर सोलापूरमध्ये पथक पोहचले. पोलिसांनी 10 किलो एमडी ड्रग्स सोलापूरमधून जप्त केले. या ठिकाणी मनोहर काळे याला ताब्यात घेतले. तसेच अक्षय नाईकवाडे याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात एकूण 8 आरोपी अटक केली असून 2 फरार आरोपी फरार असल्याचे आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. हा कारखाना कधी सुरू झाला? याची माहिती अजून मिळाली नाही.

हे सुद्धा वाचा

बंद कारखान्यात सुरु केला उद्योग

सोलापुरात श्री स्वामी समर्थ केमिकल या नावाने कंपनी सुरू होती. ही कंपनी बंद पडली. त्यानंतर मनोहर काळे याने ही कंपनी चालवण्यास घेतली. सोलापूरच्या चिंचोळी एमआयडीसीमध्ये असलेल्या या कारखान्यात ड्रग्सचे उत्पादन सुरु झाले. नाशिक पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. ललित पाटील प्रकरणाचा संबंध सोलापुरातील ड्रग्स कारखान्यासोबत आहे का? याची देखील नाशिक पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.