मुंबई : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. किरीट सोमय्या या व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या कथित व्हि़डिओवरुन पडसाद उमटणं अपेक्षित होतं. घडलं सुद्धा तसचं. आज अधिवेशनाच्या दुसऱ्यादिवशी विरोधक या व्हिडिओवरुन आक्रमक झाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी योग्य व्यासपीठावर हा विषय मांडू असं म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा किरीट सोमय्या यांच्या विषयावरुन देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. त्यांनी भाजपावर जळजळीत टीका सुद्धा केली आहे.
काय प्रश्न विचारला?
“किरीट सोमय्या यांनी माझी चौकशी करा, असं देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. किरीट सोमय्या सातत्याने ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करत होते. याच किरीट सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची चौकशी ईडी, सीबीआयकडे देणार का? असा माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
सोमय्याच्या बाबती भाजपाचे असे काही मापदंड आहे का?
“सध्या भाजपाकडून देशात कोणी, काय खावं, कोणी कुठले कपडे घालावे हे ठरवलं जातं. त्यांनी मांडलेल्या विचारावर कोणी विरोधी विचार व्यक्त केला, तर त्याला राष्ट्रविरोधी ठरवल जातं. देशद्रोही ठरवलं जातं. पाकिस्ताना घालवा अशी मागणी होते. भाजपाने स्वतच मापडंद घालून दिलेत. किरीट सोमय्याच्या बाबती भाजपाचे असे काही मापदंड आहे का? हा माझा प्रश्न आहे” असं भास्कर जाधव म्हणाले.
‘सोमय्याला क्लीन चीट देणार का?’
“धनंजय मुंडेंच्या बाबतीत करुणा शर्मा, पूजा चव्हाण यांना न्याय मिळाला नाही. उलट संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेतलं. राहुल शेवाळे यांच्याबाबतीत महिलेला न्याय मिळाला नाही. त्यामुळे भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्याय मिळेल असं वाटत नाही, फडणवीस सोमय्याला क्लीन चीट देणार का?” असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला. “लोकांना तत्वज्ञान सांगायच, लोकांना नैतिकतेच धडे द्यायचे, अशी भाजपाच्या बाबतीत अनेक उदहारण आहेत” असं जाधव म्हणाले.