सुनील जाधव, ठाणे, दि. 5 फेब्रुवारी 2024 | भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वादाची चर्चा आता राज्यभर सुरु आहे. एका जागेवरुन दोघांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे आमदार गायकवाड यांनी उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या प्रकारानंतर महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता दोघांमधील वाद सोशल मीडियावर तापू लागला आहे. त्यांच्यासंदर्भातील रिल्स व्हायरल झाले आहेत. दोघांचे समर्थक त्यांचा उदोउदो करणारे रिल्स तयार करुन व्हायरल करत आहे.
आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. कल्याण, डोंबिवलीमधील राजकारण तापले आहे. त्याचबरोबर नेटीजन्स आक्रमक झाले आहेत. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांचे समर्थक रिल्स करुन सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड समर्थकांकडून पाठिंबा देणारे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकमेकांना आवाहन प्रति-आव्हान देणारे हे रिल्स व्हायरल होत असल्याने सोशल मीडियावर वातावरण तापू लागले आहे.
महेश गायकवाड यांचे व्हायरल होणारे रिल्स#maheshgaikwad pic.twitter.com/x36iiazSF5
— jitendra (@jitendrazavar) February 5, 2024
गणपत गायकवाड यांच्या रिल्समध्ये देवेंद्र फडणवीस यांचे भाषण घेतले आहे. फडणवीस म्हणतात, हम छेडते नही, और छेडा तो छोडते नही….तर महेश गायकवाड यांच्या रिल्समध्ये जनता आहे पाठिशी…टायगर अभी जिंदा है…शेर का शिकार नही किया जाता…असे संदर्भ वापरण्यात आले आहेत. यामुळे सोशल मीडियावरील राजकारण तापले आहे.
गणपत गायकवाड यांच्यासंदर्भातील रिल्स व्हायरल#GanpatGaikwad pic.twitter.com/VjZuwyyKT4
— jitendra (@jitendrazavar) February 5, 2024
कळवा पोलीस ठाण्यामध्ये आमदार गणपत गायकवाड आणि इतर दोन साथीदारांची चौकशी क्राइम ब्रँचच्या पथकाकडून सुरु झाली आहे. कळवा पोलीस ठाण्यातील क्राईम ब्रँचचे पथक ही चौकशी करत आहे. या पथकाने गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांची अडीच तास चौकशी केली. या चौकशीत अनेक प्रश्न विचारण्यात आले.