पिंपरी- एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज दुसऱ्यांदा भेट दिली. या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी आंदोलनाची स्थिती आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. आंदोलन सुरू असेपर्यंत सर्व आंदोलक कर्मचाऱ्यांना जेवण पुरवण्याची जबाबदारी आपली जबाबदारी म्हणून आमदार जगताप यांनी स्वीकारली. तसेच अन्य कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.
मागण्या मान्य झाल्याशिवाय हटणार नाही
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात एक महिन्यांहून अधिक काळ झाले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वल्लभनगर येथे एसटीचे स्थानक व डेपो आहे. येथील190 हून अधिक कर्मचारीही राज्यभर सुरू असलेल्या अंदोलनात सहभागी आहेत. एसटी स्थानकाच्या बाहेर छोटा मंडप टाकून हे कर्मचारी शांततेने आंदोलन करत आहेत. परंतु, आता प्रशासनाने कर्मचाऱ्यांना हा मंडप हटवण्यास भाग पाडून एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसराबाहेर आंदोलन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांनी स्थानकापासून २०० मीटर परिसराबाहेर पुन्हा जामाने आंदोलन सुरू ठेवले आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी दुसऱ्यांदा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी संवाद साधला. आंदोलनाच्या सद्यःस्थितीबाबत माहिती घेतली. विलीनीकरण नाही, तर आंदोलन मागे नाही ही भूमिका कायम असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत आपण असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
MLC election | भाजप नगरसेवकांची सहल, काँग्रेसनं घेतला आक्षेप, हा आचारसंहिता भंग नाही का?
कुबेरांचं पुस्तक मी वाचलं, हल्ल्याची घटना निंदनीय, कोणत्याही प्रकारचे समर्थन नाही : शरद पवार
Jalna : कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा, रावसाहेब दानवेंचं खुलं आव्हान