Beed sarpanch murder: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकी कराड फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे. परंतु रविवारपासून तो पोलिसांना शरण येणार असल्याच्या बातम्या येत आहे. तसेच त्याला आज पुण्यात अटक झाल्याची अफवाही पसरली होती. यासर्व प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, जोपर्यंत सीआयडीकडून कन्फर्म माहिती येत नाही. तोपर्यंत आका आत गेले की नाही ते सांगणार नाही. सध्या आका आणि त्याचा मोठा आका यांच्या द्वंद्व सुरु आहे. हजर व्हावे की होऊ नये, असे हे द्वंद आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तपासात अडथळा येईल, असे वक्तव्य करु नये, असे म्हटले आहे. त्यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे माझे नेते आहेत. राज्याचे नेते आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही बाबतीत तपासात अडथळा आम्ही आणणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्किकी करडा आणि इतर गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहे. त्यावर आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतूक केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणेस जोराने कामाला लावले आहे. १५० ते २०० च्या स्पीडने पोलीस यंत्रणा काम करत आहे. त्यांची संपत्ती जप्त होणार आहे. त्यांच्या संपत्तीची जी माहिती आहे, तीसुद्ध मी देणार आहे. मी आधीच म्हटले होते की ‘बकरे की मां कबतक दुवा मांगेगी’.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात दाऊदपूर नावाचे गाव आहे. त्याठिकाणचे अजय मुंडे हे कुणाचे चुलत भाऊ आहेत. ते तपासा. दत्ता कराड हे सर्व मंडळी दाऊदपूरमधून हजारो ट्रिप वाळूचा दररोज उपसा करत आहेत. एक नाही दोन नाही तर हजारो ट्रिप वाळूचा रात्रीतून उपसा होत आहे. हे करणारे कोण लोक आहेत. त्यांचे लोकेशन तपासा. गुंड दीडशे येणार अन् त्या ठिकाणी चार अधिकारी असणार?असे कसे चालणार, असा प्रश्न सुरेश धस यांनी उपस्थित केला.