मुंबई : राज्यात सध्या चर्चा आहे ती फक्त मनसे (Mns) आणि राज ठाकरेंचीच(Raj Thackeray)…राज ठाकरेंच्या औरंगाबादल्या सभेने राजकारणातलं वातावरण टाईट केलं आहे. सगळीकडे या सभेचा मोठा बोलबाला आहे. मात्र अशातच गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मनसे-भाजप (MNS-BJP Alliance) युतीच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. गुढी पाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदललेला गिअर आणि घेतलेली हिंदुत्वाची भूमिका सध्या गाजत आहे. या भूमिकेला भाजपचाही भरभरून पाठिंब मिळत आहे. अशातच आता मुंबई महापालिकेसह राज्यातल्या इतर मोठ्या महापालिका निवडणुकांच्या निवडणुका लागत आहेत. त्यामुळे मनसेच्या इंजिनवर सवार होऊन भाजप कमळ फुलवण्याचा प्रयत्न करेल अशा चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चेवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना म्हटलं आहे, मनसे भाजप युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. या युतीच्या ज्या बातम्या आहेत, त्या कल्पीत बातम्या आहेत. काही लोकांनी सोडलेल्या बातम्या आहे. आमची अद्याप कोणतीही कोणतीही चर्चा झाली नाही. याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. एक गोष्ट मात्र निश्चित आहे. अलिकडील काळात राज ठाकरेंनी ज्या भूमिका घेतल्या आहे. त्यातल्या बहुतांश भूमिका, जसे की हिंदुत्वाची भूमिका असेल, लाऊड स्पीकर सुप्रिम कोटाच्या आदेशाने राहवे. या आमच्याही भूमिका राहिल्या आहेत. म्हणून आम्ही देखील त्या भूमिका मांडत आहोत, तेही याच भूमिका मांडत आहेत. मात्र याबाबत कुठलाही प्रस्ताव नाही. अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. असे स्प्ष्टीकरण यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
तिकडे औरंगाबादेत राज ठाकरेंच्या सभेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी मनसे नेते औरंगाबादेत ठाण मांडून बसले आहेत. पोलिसांनीही कालच या सभेला परवानगी दिली आहे. या सभेसाठी उत्तर प्रदेशातील अयोध्येतूनही काही कार्यकर्ते येणार असल्याचे कळते आहे. त्यातच आता आठवडाभरात राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहेत. तर राज्याल्या नेत्यांना भोगी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा या युचींच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र फडणवीसांनी यावर स्पष्टीकरण जरी दिले असले तरी फडणवीसांनी बोलताना जो “पण” लावला आहे…त्यावरून भविष्यात युती झाले तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.