निवडणूक लढवणार का? अमित ठाकरे यांनी दिले उत्तर

| Updated on: Feb 23, 2024 | 3:59 PM

amit thackeray mns | मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पहातोय. ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये. मी त्यांना ८ दिवसांचा वेळ दिला आहे. त्या वेळेत त्यांनी कारवाई केली नाही. तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करु.

निवडणूक लढवणार का? अमित ठाकरे यांनी दिले उत्तर
अमित ठाकरे
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे, दि. 23 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. त्यात राज ठाकरे यांची मनसेही मागे नाही. मनसेने पुणे जिल्ह्याची जबाबदारी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर दिली आहे. राज ठाकरे आतापर्यंत स्वत: निवडणूक रिंगणात उतरले नाही. परंतु अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? या प्रश्नाचे उत्तर अमित ठाकरे यांनी दिले आहे. अमित ठाकरे म्हणाल की, राज साहेबांनी जबाबदारी दिली तर मी ते म्हणतील ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. त्यांनी म्हटले तर लोकसभा लढवेल, विधानसभा लढवेल, नगरसेवक पण होईल. सरपंच ही होईल. पुण्यातून लोकसभा लढवणार आहे. पण माझी स्वत:ची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही.

पुण्यात माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पहातोय. ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये. मी त्यांना ८ दिवसांचा वेळ दिला आहे. त्या वेळेत त्यांनी कारवाई केली नाही. तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करु.

पुणे विद्यापीठाच्या मेसमध्ये झुरळ

अमित ठाकरे म्हणाले, प्रत्येक विद्यापीठात मनविसेचे युनिट हवे आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून आपणास मेसमध्ये चांगले जेवण मिळत नाहीत, त्यासाठी वेळोवेळी भांडण केले आहे. ही शोकांतिका आहे. काल विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये पोह्यात झुरळ मिळाले. त्याचे फोटो अमित ठाकरे यांनी दाखवला. वॅाशरुम आणि होस्टेलचे फोटो दाखवले.

हे सुद्धा वाचा

पुणे ड्रग्स प्रकरणात फडणवीस दोषी

पुण्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडले गेले आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. चार हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. जर ४ हजार कोटीच ड्रग्ज सापडत असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कमी पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एखाद्या शहरात एवढे ड्रग्ज सापडले तर त्याला गृहमंत्री जबाबदार आहेत.

हे ही वाचा

ठाकरे परिवारातील आई अन् मुलगा मोर्च्यात, काय आहे मागणी