महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 16 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यात त्यांना दोन वेळा वारंट बजावण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 2008 मध्ये शेंडगेवाडी येथे मनसेने रेल्वे भरतीच्या मुद्यावरुन आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याप्रकरणी राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाकडून दोन वेळा अजामीन पत्र वॉरंट बजावण्यात आला होता. आता या गुन्ह्यातून राज ठाकरे यांची मुक्तता झाल्याची माहिती मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथील हा गुन्हा आहे. रेल्वेत मराठी उमेदवारांची भरती करण्याच्या प्रकरणात मनसेने 2008 मध्ये आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. दगडफेकही झाली होती. यामुळे या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सांगलीचे मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या खटल्याचा निकाल इस्लामपूर न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने शिराळ्यातल्या गुन्ह्यातून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मनसेकडून या गुन्हातून राज ठाकरें याचे नाव काढण्याचा अर्ज इस्लामपूर न्यायालयात करण्यात आला होता.
राज ठाकरे यांना या प्रकरणात अजमीनपत्र वारंट दोन वेळा बजावण्यात आले होते. तो रद्द करण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने तो वारंट रद्द केला होता.
महाराष्ट्रात रेल्वेत भरती होत असताना परप्रांतीय उमेदवारांची निवड होते. रेल्वेच्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात न देता इतर राज्यात दिल्या जातात, असे आरोप करत सन 2008 साली मनसेने आंदोलन केले होते. त्यावेळी राज्यभर मनसेने हे आंदोलन चांगलेच गाजले होते. या आंदोलनामुळे कल्याणमध्ये राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. मनसेकडून ठिकाणी आंदोलन झाले होते. सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी या ठिकाणी मनसे बंद पुकारला होता. त्याला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे राज ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला होता.