राज ठाकरे यांनी भाजपला स्पष्ट सुनावलं, शरद पवार यांचं केलं कौतुक, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jan 08, 2023 | 10:58 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगधंद्यांबद्दल आपलं मत व्यक्त केलंय.

राज ठाकरे यांनी भाजपला स्पष्ट सुनावलं, शरद पवार यांचं केलं कौतुक, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगधंद्यांबद्दल आपलं मत व्यक्त केलंय. पण यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांनाच धारेवर धरायला सुरुवात केलीय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतलाय. एखादा उद्योगधंदा महाराष्ट्रातून बाहेर गेला तर फरक पडत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. पुण्यातल्या जागतिक मराठी संमेलनाच्या व्यासपीठावरुन राज ठाकरेंनी हे वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्तुती केली.