नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आज (शनिवार) वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास राज ठाकरे कृष्णकुंज निवासस्थानावरुन रवाना झाला. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे. (MNS Volunteers welcome Raj Thackeray in Navi Mumbai Posters at Vashi Tollnaka)
राज ठाकरेंच्या भाषणानंतर टोलनाक्याची तोडफोड
26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर वाशी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
राज ठाकरेंच्या उपस्थितीकडे लक्ष
2018, 2020 मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आलं होतं. अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे आता बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे सकाळी 11 वाजता राज ठाकरे नवी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष आहे.
मनसैनिकांकडून ग्रँड वेलकम
राज ठाकरे येणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम करण्याचं ठरवलं आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल अशी आशा मनसैनिकांना वाटते.
शिवसेनेला आणि पर्यायानं महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजप आणि मनसेची युती होऊ शकते, या चर्चेला खुद्द राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा दिला. भाजपसोबत जाण्याबाबत आता लगेच निर्णय नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे एकत्र येणार, या चर्चेला आता ब्रेक लागला आहे.
संबंधित बातम्या :
मनसेत येण्याची राज ठाकरेंची खुली ऑफर पण एका अटीवर!
शिवसेना-भाजपचा मनसेला ‘दे धक्का’; राज ठाकरेंसाठी ‘हा’ मराठी अभिनेता पुढे सरसावला
(MNS Volunteers welcome Raj Thackeray in Navi Mumbai Posters at Vashi Tollnaka)