ठाण्यात मोठा राडा, मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

| Updated on: Aug 10, 2024 | 9:01 PM

ठाण्यात आज उद्धव ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. पण त्याआधी सभागृहाच्या बाहेर मोठा राडा पाहायला मिळाला. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ आणि बांगड्या फेकण्यात आल्या.

ठाण्यात मोठा राडा, मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने
Follow us on

ठाण्यात आज उद्धव ठाकरे यांंची सभा होणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात ठाकरे हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. पण त्याआधी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दोन्ही गटाचे लोकं एकमेकांसमोर आले आहेत. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. कालच राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळेच आज उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याआधी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच गाडीवर बांगड्या आणि नारळ फेकला. दोन्ही बाजुला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्यात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळपासूनच अशा प्रकारे काही तरी गोंधळ घातला जाऊ शकतो असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे मुंबईपासून ठाण्यापर्यंत सगळीकडे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. आधी गाडीवर बांगड्या, शेण फेकले, नंतर मनसैनिक थेट उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमात घुसले. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.