ठाण्यात ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी मोबाईल लसीकरण केंद्र; सोमवारपासून शुभारंभ

| Updated on: Jun 06, 2021 | 7:16 PM

ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना रांगेशिवाय लस मिळावी म्हणून ठाणे महापालिकेने मोठं पाऊल उचललं आहे. (mobile vaccination will start from tomorrow for handicapped and senior citizens in thane)

ठाण्यात ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी मोबाईल लसीकरण केंद्र; सोमवारपासून शुभारंभ
VACCINATION
Follow us on

ठाणे: ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना रांगेशिवाय लस मिळावी म्हणून ठाणे महापालिकेने मोठं पाऊल उचललं आहे. ठाणे पालिकेने अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोबाईल लसीकरणाची सुविधा निर्माण केली आहे. त्याचा शुभारंभ उद्या सोमवारी होणार आहे. (mobile vaccination will start from tomorrow for handicapped and senior citizens in thane)

ठाणे महापालिकेने व्यापक प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. 60 वर्ष वयोगटातील जेष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षावरील अपंगत्व असणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर ये-जा करण्यासाठी त्रास होवू नये यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. या नागरिकांना घराजवळच लस देण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचेनेनुसार ठाणे महापालिकेच्यावतीने कोविड-19 मोबाईल लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे.

महापालिका भवनातून शुभारंभ

उद्या सोमवार दिनांक 7 जून 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता महापालिका भवन येथे हा शुभारंभ करण्यात येणार आहे. महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा तसेच उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण, स्थानिक नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका नंदिनी विचारे, रुचिता मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

चार तासात 100 डोस

या मोहिमेंतर्गत दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत 100 डोस देण्यात येणार आहेत. एका बसमधून डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांचे लसीकरण करणार आहेत. यासाठी वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार दररोज लस देण्यात येणार आहे, असं पालिकेकडून सांगण्यात आलं.

वॉक इन लसीकरण

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जावू नये म्हणून ठाणे पालिकेने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात 31 मेपासून ‘वॉक इन’ लसीकरण महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 419 विद्यार्थ्यांना देण्यात आली असून यामध्ये युएस, कॅनडा, जपान, फ्रांस तसेच स्पेन या देशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना समावेश आहे. (mobile vaccination will start from tomorrow for handicapped and senior citizens in thane)

 

संबंधित बातम्या:

VIDEO : उल्हानगरमधील फिल्मी थरार, चोरी पकडली जाण्याच्या भीतीने चोराची थेट नदीत उडी, व्हिडीओ व्हायरल

ठाणे महापालिकेचे श्वानांच्या लसीकरणासाठी दीड कोटी; राष्ट्रवादी म्हणते, आधी माणसांचं लसीकरण करा

15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरा, 10 टक्के सूट मिळवा; ठाणे पालिकेचं नागरिकांना आवाहन

(mobile vaccination will start from tomorrow for handicapped and senior citizens in thane)