बीड : बीडमधील एका गावात मागील चार महिन्यांपासून माकडांनी धुमाकूळ घातला होता. या माकडांनी तब्बल 250 पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिल्लाला मारले आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी माकडांचे आणि कुत्र्यांचे जणू टोळीयुद्ध सुरू आहे. या टोळीयुद्धाची देशभर चर्चा सुरू आहे. यात माकडांनी कुत्र्यांच्या पिल्लांना उंच ठिकाणी नेऊन वरतून खाली फेकले आहे. यामुळे या परिसरात कुत्री दिसेना झाली आहे.
बदल्याची सुरूवात कशी झाली?
इतिहासातल्या या सर्वात मोठ्या बदल्याची सुरूवात झाली, एका वाईट घटनेने. आधी कुत्र्यांच्या एका टोळीने माकडांच्या एका पिल्लाला मारले, त्यानंतर माकडांनीही बदला घ्यायचा ठरवला आणि त्याच बदल्यातून त्यांनी तब्बल 250 पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिल्लांना मारले आहे. त्यानंतर गावातही दहशतीचे वातावरण पसरले होते. पहिल्यांदा वनविभागाने प्रयत्न करूनही त्यांना माकडांना पकडण्यात यश आले नव्हते मात्र, आता काही माकडांना पकडण्यात यश आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
दोन माकडांना अटक
कुत्र्यांना मारणाऱ्या दोन माकडांना पकडल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. यांना नंतर जंगलात सोडण्यात येणार आहे. शेतात फळे खाण्यासाठी आलेली माकडं त्यांच्या पिल्लाला मारल्याने हिंसक झाली आणि सुरू झाले सर्वात मोठी टोळीयुद्ध. सुरूवातील गावकऱ्यांनी माकडांचा पाठलाग करून कुत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, माकडे कुत्र्यांना उच्च ठिकाणी आणि झाडावर नेत असल्याने त्यांना वाचवणे शक्य होईना. गावकऱ्यांनी वापरलेला दगडफेकीचा पर्यायही माकडांपुढे फेल ठरला. काही गावकऱ्यांवरही माकडांनी हल्ले केले आहेत, त्यामळेच गावकऱ्यांनी शेवटी कंटाळून वनविभागाला बोलवले आणि त्यानंतरच या माकडांना पकडण्यात आले आहे.
#MonkeyvsDog Patch up time have a good day pic.twitter.com/Pu5skaAukP
— Sushant ?? (@i_Sushant10) December 19, 2021
#MonkeyVsDoge trending
Meanwhile monkey to dog..? pic.twitter.com/uMzSyJ4BST— Ashutosh Srivastava (@ashutosh_sri8) December 18, 2021
#monkevsdoge Maaf kar dena Har Baar Sahi Nahi Hota! ? ? ? #TeamMonke #MonkeyvsDog pic.twitter.com/Y0QtessSYE
— Mayank Sachde?? (@Mayank_Drummer) December 18, 2021