सिंधुदुर्ग : वेळेपुर्वी येणारा मान्सून अखेर 10 जून रोजी (Maharashtra) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. 7 जून ही (Monsoon) मान्सून दाखल होण्याची खरी तारिख असताना तीन दिवस उशिराने मान्सून दाखल झाला आहे. राज्यात सर्वात प्रथम (Kokan) तळकोकणात मान्सूनच्या सरी बरसतात. गुरुवारी दुपारपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाला सुरवात झाली होती. तेव्हाच मान्सून दाखल झाल्याचे वेध लागले होते. 7 जूनला दाखल होणारा मान्सून 10 जून रोजी आला असला तरी आता महाराष्ट्रात लवकरच सक्रीय व्हावा अशी अपेक्षा आहे. शिवाय या संदर्भात हवामान विभागानेही अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले आहे. केरळात दाखल झालेला मान्सून कर्नाटकातील समुद्रकिनारी रेंगाळला. त्यामुळेच राज्यात येण्यासाठी उशिर झाला. पण आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनने आपली दस्तक दक्षिण कोकणात दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी दुपारी मान्सून पावसाने आपली दस्तक दिली. आगमनाच्या दरम्यान पावसामध्ये जोर नसला तरी सातत्य होते. जिल्ह्यात पावसाच्या लहान – मोठ्या सरी बरसू लागल्या आहेत. आगामन उशिरा झाले असले तरी दणक्यात सुरवात केली तर खरिपाच्या पेरण्या वेळेत होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रखडलेली शेतीकामे अधिक गतीने होणार आहेत.
राज्यात कोकणातून मान्सूनचे आगमन होते तर परतीच्या पावासानंतर मान्सून हा राजस्थानातून निरोप घेतो. कोकणातील तळकोकणातून दरवर्षी मान्सून राज्यात दाखल होतो. यंदा उशिर झाला असला तरी सातत्य असल्याने मोठा दिलासा आहे. गुरुवारी कोकणातून मान्सून आता राज्याच मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे दोन दिवासांमध्येच मान्सूनचे चित्र स्पष्ट होणार आहे. पावसाला जोर नसला तरी सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यात लागत आहे. मोसमी पाऊस आज सुरू झाल्याने शेतकऱ्यांना ही दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगामातील उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी यंदा सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. शिवाय यंदा वेळेपूर्वीच पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांनी खरीपपूर्व कामे उरकती घेतलेली आहेत.त्यामुळे आता तरी पावसाने दणक्यात हजेरी लावली तरी उत्पादनात वाढ निश्चित होणार आहे. सर्वकाही पोषक असले तरी ज्या पावसावर खरीप हंगाम अवलंबून आहे तो मान्सून आता बरसावा अशी आशा शेतकऱ्यांना आहे.