राज्यात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरु होणार असल्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या वाटचालीसाठी राज्यात पोषक स्थिती आहे. बुधवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मॉन्सून गोव्यातच अडखळला आहे. आज तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये दोन दिवस आधीच पाऊस दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या १० जूनपर्यंत मान्सून मुंबई आणि महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सून दाखल होण्याच्या आधी राज्यात प्री मान्सून पाऊसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह काही भागात हा प्री मान्सून पाऊस पडू शकतो. पण प्रत्यक्षात मात्र मान्सूनच्या पावसाला १० जूननंतरच सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढल्याने मुंबईसह राज्यात लोकं हैराण झाले आहेत. पण येत्या २-३ दिवसात प्री मान्सून पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
उत्तर भारतात उष्णतेची प्रंचड लाट आहे. गुजरात, राजस्थान आणि दिल्लीमध्ये तापमानाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. राजस्थानाच तापमान ५० अंशांच्या वर गेला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे घराबाहेर पडणे ही कठीण झाले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार आता नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे.पुढील 3 दिवसात नैऋत्य मान्सून हा कर्नाटकच्या उर्वरित भागात त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील काही भाग पोहोचेल. नैऋत्य मान्सून 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
शनिवारी मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकू शकतो. ज्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने म्हटले की, आजपासून अनेक भागाच अंशतः ढगाळ वातावरण राहिल. काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.
उत्तर-पश्चिम भारतात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की आसाम आणि मेघालयमध्ये 07 ते 08 जून दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD नुसार, आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे. केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटकात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ईशान्येकडील राज्यांना अजूनही उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. या राज्यांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. IMD ने सांगितले की 8 ते 9 जून दरम्यान उत्तर भारतात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.