IMD Update: यंदा ऑक्टोंबर महिन्यात जोरदार बरसणार, नवरात्रात या तारखांना पाऊस…डिसेंबरपर्यंत पाऊस लांबणार

| Updated on: Oct 04, 2024 | 12:33 PM

imd prediction: विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला आहे. वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मान्सून परतला आहे. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून परतणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

IMD Update: यंदा ऑक्टोंबर महिन्यात जोरदार बरसणार, नवरात्रात या तारखांना पाऊस...डिसेंबरपर्यंत पाऊस लांबणार
rain alert
Follow us on

Weather update: यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. आता ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात सरासरीपेक्षा ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोंबर महिन्यात ७५.४ मिमी पाऊस पडतो. डिसेंबर महिन्यापर्यंत पावसाचे संकेत भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्यूजंय महापात्रा यांनी दिले.

ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मान्सून

हवामान विभागाने मे महिन्यात नैर्ऋत्य मान्सून १०६ टक्के पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा पाऊस चांगला झाला. आता ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मान्सूनदेखील चांगला होणार आहे. या काळात दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणार आहे. तसेच महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे.

वायव्य भारतातून परतीचा प्रवास

वायव्य भारतातून परतीचा मान्सूनचा प्रवास सुरु झाला आहे. मान्सून वारे देशातून गेल्यानंतर दक्षिण भारतात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या भागात ईशान्य मोसमी वारे सक्रीय होतात. हे वारे बंगालच्या उपसागरातून बाष्प घेऊन येतात अन् दक्षिण भारतात पाऊस पाडतात.

नवरात्र उत्सावात पाऊस

नवरात्र उत्सावात यंदा पाऊस असणार आहे. दोन दिवस पावसाची विश्रांती असून ६ ऑक्टोंबरपासून पाऊस सक्रीय होणार आहे. ६ ते ९ ऑक्टोंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, यंदा राज्यात १२६ टक्के पाऊस झाला आहे. सामान्यपेक्षा जास्त पावासाचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला. २०२३ मध्ये राज्यात पाऊस कमी झाला होता. तो यंदा चांगला झाला.

विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला आहे. वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मान्सून परतला आहे. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून परतणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. यंदा मान्सूनचा परत जाण्याचा प्रवास लांबला आहे. संपूर्ण राज्यातून मान्सून परत जाण्यासाठी १० ऑक्टोंबर उजाडेल, असा अंदाज आहे.