Sangliमध्ये FRP, वीज कनेक्शन तोडणीविरोधात मोर्चा, Raju Shetti आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की
उसाची एफआरपी (FRP) आणि वीज कनेक्शन तोडणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली तिरडी मोर्चा (Morcha) सांगलीत काढण्यात आला. यावेळी रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उसाची एफआरपी (FRP) आणि वीज कनेक्शन तोडणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली तिरडी मोर्चा (Morcha) सांगलीत काढण्यात आला. कारखानदाराचा प्रतिकात्मक पुतळा काढून घेण्यावरून भर मोर्चात रस्त्यावर राजू शेट्टींचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात जोरदार वादावादी, झटापट, धक्काबुक्की झाली. सरकारमधील रक्षकच भक्षक बनले आहेत. पालकमंत्री जयंत पाटील याला जबाबदार आहेत, असे म्हणत राजू शेट्टी यांनी जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम आणि कारखानदार यांच्यावर हल्लाबोल केला. उसाची एक रकमी एफआरपी आणि सक्तीची वीज कनेक्शन तोडणी बंद करून दहा तास दिवसाची वीज द्यावी, या प्रमुख मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक तिरडी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भर रस्त्यातच राजू शेट्टी याचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात प्रतिकात्मक कारखानदार यांचा पुतळा काढून घेण्यावरून जोरदार वादावादी झटापट आणि धक्काबुक्की झाली. यावेळी रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Latest Videos