“विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता”, वेगळ्या विदर्भासाठी वामनराव चटपांचा एल्गार

| Updated on: Jul 10, 2021 | 9:27 PM

विदर्भवादी नेत्यांनी धुंदी घाटात जाऊन स्वतंत्र विदर्भासाठीचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे. यावेळी विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता, असा इशारा माजी आमदार तथा विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी केंद्र सरकारला दिला.

विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता, वेगळ्या विदर्भासाठी वामनराव चटपांचा एल्गार
वेगळ्या विदर्भासाठीचे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
Follow us on

यवतमाळ : वेगळ्या विदर्भसाठीची चळवळ पुन्हा तीव्र झाली असून विदर्भवादी नेत्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचे संकेत दिले आहेत. लोकनायक बापूजी अणे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून पुसद तालुक्यातील धुंदी घाटात 10 जुलै 1930 रोजी वन सत्याग्रह केला. याच पार्श्वभूमीवर आता विदर्भवादी नेत्यांनी धुंदी घाटात जाऊन स्वतंत्र विदर्भासाठीचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे. यावेळी विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता, असा इशारा माजी आमदार तथा विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी केंद्र सरकारला दिला. (movement of separate vidarbha will be intensify soon said Wamanrao Chatap)

आता स्वतंत्र विदर्भसाठी चळवळ

वेगळ्या विदर्भाचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी त्यांची चळवळ पुन्हा एकदा तीव्र केली आहे. येणाऱ्या नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच क्रांती दिनी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. तशी माहिती विदर्भ जन आंदोलन समितीचे माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली आहे.

फडणवीसांवर टीका करताना थोरातांकडून वेगळ्या विदर्भाचा संदर्भ

दरम्यान, मागीला काही दिवसांपूर्वी सध्याच्या ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ (Separate Vidarbha) होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण (Dhangar reservation) सोडवू असं म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण (OBC reservation) दिलं नाही तर संन्यास घेईन म्हणतात, मात्र यापैकी काही झालं नाही”, असा टोला काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला होता.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी, बीडमध्ये भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांचे राजीनामे

…म्हणून मी मातोश्रीबाहेर बेशरमाचं झाड लावणार, आमदार रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका

रेल्वेत घुसून गर्दीचा फायदा घ्यायचा, संधी मिळताच डाव साधायचा, सराईत गुन्हेगाराला अखेर बेड्या

(movement of separate vidarbha will be intensify soon said Wamanrao Chatap)