मुंबईः बाळासाहेब आजही आमच्या हृद्यात भिनलेले आहेत. आजच्या दिवशी मन दाटून येते. बाळासाहेबांच्या दसऱ्याच्या भाषणातून एक मोठी ऊर्जा घेऊन जात होतो. त्यांच्यासाठी राष्ट्र पहिले होते. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून आहे. सरसंघचालक भागवतही म्हणालेले आमचा DNA एक आहे, असे प्रतिपादन बुधवारी खासदाकर अरविंद सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींचा पेटारा उलगडला. त्यामुळे स्वतः खासदार सावंत यांच्यासह उपस्थित शिवसैनिक थोडे भावुक झाल्याचे दिसले.
आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून
खासदार अरविंद सावंत म्हणाले, बाळासाहेब आजही आमच्या हृदयात भिनलेले आहेत. आजच्या दिवशी मन दाटून येते. दसऱ्याच्या भाषणावेळी मोठी उर्जा घेऊन जात होतो. शिवसैनिकांची बाळासाहेबांवर भक्ती होती. ते त्यांचे जातीविरहित भक्त होते. बाळासाहेबांसाठी राष्ट्र पहिले होते. त्यांच्यामुळे हिंदुत्वाचा दोर आम्हाला कळला. त्यांनी राजकीय लाभाचा कधीही विचार केला नाही. बाबासाहेबांच्या घटनेवर हात ठेवत साक्ष द्या, म्हणणारे बाळासाहेब होते. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून आहे. यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत ही म्हणाले होते, आमचा डीएनए एक आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.
तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेणं सोडा
खासदार सावंत म्हणाले, त्या लोकांनी खरे तर बाळासाहेबांचे नाव घेणे सोडले पाहिजे. साहेबांची पुण्यतिथी असताना हे कार्यक्रमांचे उद्घाटन करत आहेत. हे सर्व दांभिक आहे. त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांचे नाव घेणे सोडा. आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत. एका चिडीतून हे सरकार स्थापन झाले, असे म्हणत त्यांनी भाजपवर टोलेबाजी केली. शिवाय कंगना राणावतवर भाष्य करताना नको त्या माणसाला किंमत देण्याची गरज नाही, असा टोला हाणला.
बाळासाहेब आजही आमच्या हृदयात भिनलेले आहेत. आजच्या दिवशी मन दाटून येते. दसऱ्याच्या भाषणावेळी मोठी उर्जा घेऊन जात होतो. शिवसैनिकांची बाळासाहेबांवर भक्ती होती. ते त्यांचे जातीविरहित भक्त होते. बाळासाहेबांसाठी राष्ट्र पहिले होते. त्यांच्यामुळे हिंदुत्वाचा दोर आम्हाला कळला. त्यांनी राजकीय लाभाचा कधीही विचार केला नाही. बाबासाहेबांच्या घटनेवर हात ठेवत साक्ष द्या, म्हणणारे बाळासाहेब होते.
Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!https://t.co/utzB0ZkKLN | #Healthcare | #Water | #dangerous | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
इतर बातम्याः
Nashik|पैल्या धारंच्या प्रेमानं साला…हळदीत गाणं वाजलं अन् लग्नाआधीच नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात!