उस्मानाबादः अधिकार आले की, अधिकारी उन्मत्त होतात. राजे असल्यासारखे वागतात. आपण दीनदुबळ्या, गरिबांसाठी काम करणारे कर्मचारी आहोत, हेच विसरतात. अशाच एका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबादमध्ये चांगलीच खरडपट्टी काढल्याची घटना घडली. हा अधिकारी पीक कर्जासोबत शेतकऱ्यांना तब्बल 10 हजारांचा विमा बंधनकारक करत होता. तो अधिकारी शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे उकळत असल्याचा आरोप आहे. जे शेतकरी हे पैसे देत नसत त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जायची. या अधिकाऱ्याला खासदारांनी चांगले फैलावर घेतले.
अन् खासदारांचा पारा वाढला…
खासदार ओमराजे निंबाळकर शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर SBI अधिकाऱ्याला जाब विचारायला गेले. तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या दालनातही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. हे अधिकारी कसे दालनाबाहेर काढतात, हे सांगितले. हे सारे खोटे असेल तर सीसीटीव्ही फुटेज काढून पाहा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना दिलेली वागणूक ऐकताच खासदार निंबाळकर यांचा पारा चढला. त्यांनी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांसमोरच फैलावर घेतले. ते म्हणाले, तुम्ही काय भाषेत बोलता, तुम्हाला शोभलं पाहिजे साहेब. तुम्ही इतके वयस्क आहात, तुमच्या वयाचा तरी तुम्ही आब राखा. तुम्ही मॅनेजर आहात. या भाषेत बोलता लोकांना. तोंडावर कागदं मारता, असा सवाल केला. तेव्हा अधिकाऱ्याचा चेहऱ्या पाहाण्यासाराखा झाला होता.
म्हणे स्कीमच तशी…
खासदार निंबाळकर पुढे म्हणाले, तुम्ही तुमच्या घरचे जहागीरदार आहात. त्या बिचाऱ्यांनं काय करावं. त्या बिचाऱ्यांना कर्जाची गरज आहे म्हणून आलेत तुमच्याकडे. तुम्ही त्यांचे 10 हजार कशाला काढायला लागले. तुम्ही अर्ज घेतला का. किती लोकांचा विमा काढला. तुम्हाला असा 10 हजारांचा विमा काढण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही दोन किंवा चार हजारांचा विमा काढण्याची मागणी केल्याचेही सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांनी ही स्कीमच तशी असल्याची सावरासावर केली. हे ऐकुण खासदारांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी पुन्हा या अधिकाऱ्याला झापून काढले.
डीडीआरकडे करू तक्रार
खासदार निंबाळकर याप्रकरणी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आधीच शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीने तो कोलमडून पडला आहे. आणि बँकेमध्ये कर्ज मागायला गेलेल्या शेतकऱ्यांचीही लूट सुरू आहे. मी डीडीआर साहेबांना शेतकऱ्यांचे जबाब नोंदवा अशी विनंती केली आहे. शेतकऱ्यांच्या मर्जीप्रमाणे विमा काढला की, त्यांची अडवणूक करून विमा काढला, याची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी खासदारांनी केली.
इतर बातम्याः
Nashik|पैल्या धारंच्या प्रेमानं साला…हळदीत गाणं वाजलं अन् लग्नाआधीच नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात!
Malegaon: मध्यरात्री रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे; दंगल पू्र्वनियोजित असल्याचा आमदार मुफ्तींचा दावा
Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!https://t.co/utzB0ZkKLN | #Healthcare | #Water | #dangerous | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021