रिया चक्रवर्ती हिला ठाकरे पिता-पुत्रांचे 44 फोन गेले? शिंदे गटाच्या खासदाराचा रोख नेमका काय?

| Updated on: Dec 21, 2022 | 5:13 PM

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आज थेट लोकसभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.

रिया चक्रवर्ती हिला ठाकरे पिता-पुत्रांचे 44 फोन गेले? शिंदे गटाच्या खासदाराचा रोख नेमका काय?
Follow us on

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. कारण आज थेट लोकसभेत या प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लोकसभेत देशाच्या प्रत्येक विभागातील लोकप्रतिनिधी उपस्थित असतात. देशभरातील नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याबाबत लोकसभेत चर्चा होते. याच लोकसभेत महाराष्ट्राच्या एका खासदाराने राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर थेट लोकसभेत गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी राहुल शेवाळे यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले आहेत.

YouTube video player

हे सुद्धा वाचा

“सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावाने कॉल आले होते. AU म्हणजे आदित्य आणि उद्धव असं बिहार पोलिसांनी सांगितलं”, असा गंभीर आरोप राहुल शेवाळेंनी केलाय.

“सुशांत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयने चौकशी केली होती. पण अजूनही अनेक प्रश्नांचं उत्तरं लोकांना मिळालेली नाहीत”, असं राहुल शेवाळे म्हणाले.

“सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपास कुठपर्यंत पोहोचलाय? याप्रकरणी सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलीय का? सुशांतच्या शरीरावर मारहाण केल्याचे निशाण होते का? सुशांत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनची फोनवर झालेल्या बातचितचा तपास झालाय का?”, असे सवाल राहुल शेवाळे यांनी केले.

“10 जून 2020 ला दोन व्यक्ती सुशांत सिंह राजपूतच्या घराबाहेर आले होते का? त्याचा लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्ऱॉनिक वस्तू हिसकावण्यात आल्या का? रिया चक्रवर्ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती का? हे खरंय का?”, असे प्रश्न राहुल शेवाळे यांनी लोकसभेत उपस्थित केले.

“या प्रकरणात AU चं नाव आलंय. रिया चक्रवर्तीला AU नावाने 44 फोन आले. लिगलमध्ये AU अनन्या उदास बोलतात. पण बिहार पोलिसांच्या तपासात आदित्य आणि उद्धव असं नाव समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.