मुंबई : “संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे. त्याला काही ना काही बडबड करून, कोणाला नांदू द्यायचं नाही असं असतं. त्यांनी आम्हाला जो खुराडा म्हटलं, ते रमजानमध्ये शीर कुरमा जास्त खाल्ल्यामुळे. त्यांच्यावर कापायचा प्रभाव जास्त झालेला आहे” अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी टीका केली.
“ज्याची नसबंदी झालेली असते, ज्याला मुलं होत नाही असं म्हणतात, मात्र संजय राऊत असा एक चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यानंतरही आम्हाला मुल होईल असं सांगण्याचा पर्याय आहे” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
सैराट सारखा पिक्चर काढणार
“18 खासदारांपैकी 13 खासदार निघून गेले. पाच राहिले, तरी दावा 19 चा करतात हे मूर्खपणाच लक्षण आहे ते संजय राऊतमध्ये आहे” असं संजय शिरसाट म्हणाले. संजय राऊत यांनी ‘द डायरी ऑफ महाराष्ट्र खोके’ सिनेमा काढण्याची घोषणा केली. त्यावर संजय शिरसाट यांनी संजय राऊत हा सैराट सारखा पिक्चर काढणार असं म्हटलं आहे.
प्रेम संबंधाचा अंत सुसाईडमध्ये
“राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे जे प्रेम संबंध चालू आहेत, त्याचा अंत सुसाईडमध्ये होणार. त्याच्यावर त्यांनी पिक्चर काढायला पाहिजे होता” असं संजय शिरसाट म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल काय म्हटलं?
गजानन कीर्तिकर जागा वाटपाबद्दल बोलले, त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, “जागा वाटपाची प्राथमिक बोलणी सुद्धा सुरू झालेली नाही. आमची बोलणी सुरू होईल. त्याच्यानंतर योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे घेतील” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.