या महत्त्वाच्या मुद्यांवरून कोर्टानं ईडीला झापलं, संजय राऊत जामीन प्रकरण

| Updated on: Nov 09, 2022 | 9:09 PM

सुनावणीवेळी ईडीला चांगलीच चपराकही लगावली.

या महत्त्वाच्या मुद्यांवरून कोर्टानं ईडीला झापलं, संजय राऊत जामीन प्रकरण
संजय राऊतांना जामीन का मिळाला?
Follow us on

मुंबई : कोर्टानं संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. ईडीनं आता सेशन कार्टात नि त्यानंतर हायकोर्टात धाव घेतली. दोन्ही ठिकाणी ईडीचा अर्ज नाकारण्यात आला. सेशन कोर्टानं अर्ज नाकारताना ईडीला झापलं. न्यायालयाचं निरीक्षण आहे ते आम्ही सांगत होतो, माझी तब्ब्य जरा बरी नाही. बरं वाटलं की, नक्की बोलीन, असं संजय राऊत म्हणाले.

आज नाट्यमय घडामोडी घडल्या. दुपारी दीड वाजता संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. ईडीनं दुपारी तीन वाजता जामिनाविरोधात सेशन कोर्टात धाव घेतली. पीएमएलए कोर्टानं राऊत यांचा जामीन रद्द करण्यास नकार दिला. त्यानंतर साडेचार वाजता ईडीनं हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. हायकोर्टानंही राऊतांचा जामीन रद्द करण्यास नकार दिला.

कोर्टानं ईडीचा अर्ज रद्द केला. शिवाय सुनावणीवेळी ईडीला चांगलीच चपराकही लगावली. संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे. असे प्रश्न उपस्थित करत कोर्टानं थेट ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जामीन देताना 122 पानांचा आदेश पीएमएलए कोर्टानं काढला. 9 मुद्द्यांवरून कोर्टानं ईडीचे कान टोचले.

संजय राऊत यांना कुठलंही कारण नसताना अटक झाली. राऊतांबरोबर प्रवीण राऊत यांचीही अटक बेकायदेशीर आहे. पत्राचाळ प्रकरणात साक्षीदारांच्या जबाबातून मुख्य आरोपी समोर आलेत. प्रमुख आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना ईडीकडून अटक झाली नाही. प्रवीण राऊत यांना दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली. पत्राचाळ प्रकरणात म्हाडाची भूमिका संशयास्पद दिसते. तरीही म्हाडाचा कुठलाही कर्मचारी आरोपी करण्यात आला नाही, अशा काही मुद्यांवरून कोर्टानं ईडीला चांगलंच झापलं.