औरंगाबादः वीज ग्राहकांच्या घरी जाऊन चुकीचे मीटर रीडिंग घेणाऱ्या कंपन्यांवर महावितरणने (MSEDCL) कठोर कारवाई केली आहे. चुकीचे रीडिंग घेत महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणे आणि वीजबिल (Electricity Bill) दुरुस्तीसाठी ग्राहकांना त्रास देणाऱ्या राज्यातील सहा एजन्सींना महावितरणने बडतर्फ केले आहे. या एजन्सी राज्यातील ग्राहकांच्या घरी जाऊन मीटरचे रीडिंग घेण्याचे काम करत होत्या. कारवाई झालेल्या राज्यातील सहा एजन्सींमध्ये औरंगाबादसह नांदेड (Aurangabad), वसई, पुणे, अकोल येथील एजन्सींचा समावेश आहे. या एजन्सींना बडतर्फ करण्यात आले असून त्यांचे नाव ब्लॅक लीस्टमध्ये टाकण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीज मीटरचे रीडिंग 100 टक्के अचूक झालेच पाहिजे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 1 फेब्रुवारीला राज्यभरातील मीटर रीडिंग एजन्सीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. तसेच चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांना होणारा त्रास आणि महावितरणचे नुकसान सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला होता. तसेच विविध एजन्सीने केलेल्या रीडिंगची पडताळणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यानुसार सहा एजन्सीतील कामात दोष आढळला असून त्यांच्यावर आता बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
इतर बातम्या-