Marathi News Maharashtra Mukhyamantri ladki bahin yojana each woman have to give declaration on scheme terms and conditions
लाडकी बहीण योजना : …तर तुमचा अर्ज बाद होणार, हमीपत्र वाचलं का? नेमके नियम काय?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्यासोबत हमीपत्र देखील जोडण्यात आलं आहे. या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणं बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात.
लाडकी बहीण योजना : ...तर तुमचा अर्ज बाद होणार, हमीपत्र वाचलं का?
Follow us on
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अर्जाच्यासोबत हमीपत्र देखील जोडण्यात आलं आहे. या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणं बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात. या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळेल त्यांच्यासाठी अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत. यातील महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षित उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं. संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसावा. महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावं. तसेच महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेचा 1500 पेक्षा जास्त रुपयांचा आर्थिक लाभ घेतलेला नसावा. या सर्व अर्जाच्या हमीपत्रातून स्पष्ट होत आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र होणे तितके सोपे नाहीत. कारण प्रत्येक नियम या अर्जात पाहिले जाणार आहेत. नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं हमीपत्र वाचा जसं आहे तसं
मी घोषित करते की…
माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक नाही,
माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमितर/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किया राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा समानिवृतीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रु.१,५००/- पेक्षा जास्त रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किया माजी खासदार/आमदार नाही.
माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपरिशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.
माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही.
माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.
मी वरीलप्रमाणे घोषित करते की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना संबंधित पोर्टल अॅपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रीक किंवा यतः टाइम पीन (OTP) माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करु शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई-केवायसी (e-KYC) वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे.
(अर्जदाराची सही)
नोट-
१. उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरीता आहे.
२. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ठ झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS/ व्हाट्स अॅप द्वारे सुद्धा पाठविण्यात येईल.
अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी.