Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, पहिल्या टप्पात इतक्या महिलांना मिळणार पैसे, 1500 की 2100 किती रुपये मिळणार?

| Updated on: Dec 24, 2024 | 11:50 AM

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, पहिल्या टप्पात इतक्या महिलांना मिळणार पैसे, 1500 की 2100 किती रुपये मिळणार?
Ladki Bahin Yojana
Follow us on

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यांच्या अंतिम महिन्याच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहे. योजनेसाठी लागणारा 3500 कोटी रुपयांची निधी वर्ग करण्यात आला आहे. लाडक्या बहिणांना 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये त्याचेही स्पष्टीकरण झाले आहे.

आजपासून खात्यात येणार रक्कम

राज्यात विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. राज्यात ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली. जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यानंतर जुलैपासून या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली. तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोंबर अन् नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

लाडक्या बहिणींमुळे निवडणुकीत यश

राज्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुतीला मिळाला. महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. महायुतीचे 230 जागांवर उमेदवार निवडून आले. भाजपला प्रथमच 132 जागा मिळाल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागांवर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागांवर विजय मिळाला. महायुतीने लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीत केली होती. त्यानुसार आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून वाढीव 2100 रुपये मिळणार की 1500 रुपयेच देण्यात येणार त्याचे स्पष्टीकरण झाले आहे.

डिसेंबरमध्ये 1500 रुपयांप्रमाणे मिळणार पैसे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. 2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.