मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच कोरोनामुळे (Corona) मुंबईकरांची झोप उडण्याची शक्यता आहे. कारण, आज मुंबईत (Mumbai) तब्बल 5 हजार 428 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता 16 हजार 441 वर पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब ही की आज ओमिक्रॉनची (Omicron) लागण झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही, तशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 8 हजार 67 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 766 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 66 लाख 78 हजार 821 इतकी झाली आहे. राज्यात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 24 हजार 509 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 75 हजार 592 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 79 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मुंबईत कडक निर्बंध लावण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. मॉल्स धारकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होतंय की नाही? यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून पाहाणी करण्यात आली. मुंबईतील ओबेरॉय मॉल, ग्रोव्हल मॉल आणि अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलमध्ये महापौर किशोरी पेडणेकरांनी अचानक भेट दिली.
मुंबईच्या “VITS” या पंचतारांकित हॉटेल येथे प्रत्यक्ष आकस्मिक भेट देऊन कोविड व ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या सुव्यवस्थापनाची माहिती घेतली त्याप्रसंगी सोबत उपमहापौर श्री सुहास वाडकर जी उपस्थित होते. pic.twitter.com/cZn9UvvG5w
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) December 31, 2021
नागरिक मॉलमध्ये नियमांचे पालन करताना बघायला मिळत आहे. मॉल्सच्या आतमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी स्वतंत्र्य कर्मचाऱ्यारी नेमणूक करण्यात आली आहे. सोबतच सॅनिटायझेशन आणि मॉलमध्ये आत येणाऱ्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे की नाही? सोबतच तापमान देखील चेक करण्यात येत आहे. त्यामुळे तुर्तास तरी नियमांचे पालन होताना दिसून येत आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. राज्यात मागील काही दिवसात कोरोना रुग्ण कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता, निर्बंध थोडे शिथिल झाले होते, मात्र पुन्हा राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा 8 हजारांच्या पुढे गेल्याने निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.
गोरेगाव परिसरातील ओबेराय मॉल येथे प्रत्यक्ष आकस्मिक भेट देऊन कोविड व ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या सुव्यवस्थापनाची माहिती घेतली त्याप्रसंगी सोबत उपमहापौर श्री सुहास वाडकर जी उपस्थित होते. pic.twitter.com/E2f6RPHj75
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) December 31, 2021
इतर बातम्या :