मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबईसारख्या (Mumbai) शहरात रुग्णसंख्या वाढीचा वेगही प्रचंड वाढलाय. अशावेळी मुंबई महापालिकाने कोरोना निर्बंध (Corona Restrictions) अधिक कठोर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील शाळा बंद ठेण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता कोरोना रुग्ण आढळून आलेली इमारत सील करण्याबाबतही महापालिकेनं नवी नियमावली जाहीर केली आहे.
मुंबईतील रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी 20 टक्के नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण विंग किंवा इमारत सील करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. कोरोना रुग्ण आढळलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी महापालिकेनं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणं बंधनकारक असणार आहे. महापालिकेची ही नियमावली आतापासूनच लागू होत असल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.
Latest Updates 03.01.22
✅ Buildings will be Sealed only if more than 20% of total flats of the buildings are infected.
✅ Home quarantined period of positive patients will end at 10 days.
✅ Home quarantined period of contacts of the patient will end on 7 days if tested -ve. pic.twitter.com/2WSuRuawdO
— KIRAN DIGHAVKAR (@DighavkarKiran) January 3, 2022
>> इमारतीच्या किंवा विंगच्या एकूण क्षमतेपैकी 20 टक्के रहिवारी कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सिल केली जाईल.
>> आयसोलेट आणि होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणं गरजेचं आहे.
>> रुग्णांना लक्षणं दिसून आल्यास किमान 10 दिवस आयसोलेट राहणं बंधनकारक आहे.
>> हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या नागरिकांनी 7 दिवस होमक्वारंटाईन व्हावं. तसंच 5 ते 7 दिवसांच्या आत कोरोना चाचणी करावी.
>> इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आल्यास रुग्ण आणि त्या कुटुंबाला अन्न, औषध तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पाठपुरावा केला जाईल याची काळजी सोयायटीच्या कमिटीनं घ्यावी.
>> पालिकेचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीच्या कमिटीनं सहकार्य करावं
>> इमारती सीलमुक्त करण्याचा निर्णय वॉर्ड स्तरावर घेतला जाणार आहे.
Mumbai | Brihanmumbai Municipal Corporation issues fresh guidelines for sealing, says that the whole building or a wing shall be sealed if more than 20% of the occupied number of flats in the building or wing has Covid19 patients pic.twitter.com/FRgbctz89I
— ANI (@ANI) January 3, 2022
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.
इतर बातम्या :