मुंबई : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना आमच्या कुटुंबाविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात केली होती. ही मागणी कोर्टाने अमान्य केल्यानंतर नवाब मलिक यांनी आणखी एक नवे ट्विट केले आहे. त्यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत लढा सुरुच राहील असं सांगितलंय.
मलिक यांना माझ्या कुटुंबीयांविरोधात सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यास मनाई करावी, अशी मागणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टाकडे केली होती. ही मागणी न्यायालयाने अमान्य केली. त्यानंतर नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. “कुणी गैर करत असेल. कोणी अन्याय करत असेल तर त्याविरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार आहे. सत्यमेव जयते. या देशामध्ये बोलण्यावर बंदी कोणी घालू शकत नाही. जर एखादी व्यक्ती जबाबदारीने बोलत असेल तर प्रत्येक नागरिकाचा तो मौलिक अधिकार आहे. परंतु काही लोकांना हे कळलं नाही,” असा टोला नवाब मलिक यांनी लगावलाय.
Satyamev Jayate
The fight against wrongdoings will continue…— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 22, 2021
मागील अनेक दिवसांपासून अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. त्यांनी चुकीचे कागदपत्रे सादर करुन मागासवर्गीयाची एक जागा बळकावली आहे, असा आरोप केलेला आहे. हा आरोप सत्य असल्याचे सांगण्यासाठी मलिक मागील अनेक दिवसांपासून अनेक कागदपत्रे सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. समीर वानखेडे यांच्याशी संबधित हे कागदपत्रे असल्याचा दावा मलिक यांच्याकडून केला जातोय. यामध्ये मलिक यांची कन्या सना मलिक यांनीसुद्धा उडी घेतलेली आहे. त्यादेखील ट्विटरवर अनेक कागदपत्रे अपलोड केलेल आहेत.
समीर वानखेडे याच्या वडिलांनी नवाब मलिक यांना त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात बोलण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्यापासून रोखता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच कोर्टाने नवाब मलिक यांना काही निर्देश दिला आहेत. त्यांनी सोशल मिडियावर कुठलीही पोस्ट किंवा डॉक्यूमेंट टाकण्याच्या पूर्वी त्याची खात्री करून घ्यावी. यासंदर्भात दोन आठवड्यात मलिक यांनी उत्तर द्यावे,” असे न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
इतर बातम्या :
‘दंगलीत आरोपी असलेल्या अनिल बोंडेंनी शहाणपणा करु नये’, अशोक चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर