सरकार आमचं, महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच, उद्धव ठाकरेंचा काय संबंध?, चक्क छगन भुजबळ धावले उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी

| Updated on: May 14, 2024 | 12:08 PM

chhagan bhujbal and uddhav thackeray: होर्डिंगमुळे मृत्यू झालेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय होता? शासन 5 लाख देईल? म्हणजे संपलं का? या प्रकरणाची चौकशी करुन कठोर शिक्षा होण्याची गरज आहे.

सरकार आमचं, महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच, उद्धव ठाकरेंचा काय संबंध?, चक्क छगन भुजबळ धावले उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी
chhagan bhujbal and uddhav thackeray
Follow us on

Mumbai Ghatkopar Hoarding Accident: मुंबईत वादळी वाऱ्यामुळे सोमवारी हाहा:कार उडला. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपाच्या बाजूला बेकायदेशीर लावण्यात आलेले होर्डिंग कोसळले. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात एकीकडे प्रशासन मदत कार्यात गुंतले असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी हाहा:कार उडत आहे. भाजपने या प्रकरणात उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. होर्डिंग असलेला कंपनीचा मालक भावेश भिडे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आमदार राम कदम यांनी शेअर केले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर सर्व प्रकरणाचे खापर फोडले आहे. आता या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी त्यांच्या पक्षातील नव्हे तर विरोधी पक्षातील नेता धावून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे… उद्धव ठाकरेंचा काय संबंध? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ

राज्यात सरकार आमचं आहे. मुंबई महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे. राजकीय नेत्यांना अनेक लोक भेटण्यास येतात. व्यापारी सगळ्यांकडे येतात. मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात. यामुळे यामध्ये उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही. या प्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये, असे भुजबळ यांनी म्हटले.

अनेक बेकायदेशीर हॉर्डिंग

मुंबईत एअर पोर्टकडे जाताना असे अनेक हॉर्डिंग दिसतात. ते होर्डिंग समांतर हवे होते पण ते रस्त्यावर आहेत. त्यांचे वजन सुद्धा भरपूर आहे. हे सगळे अनधिकृत आहेत. त्या सर्व होर्डिंगची चौकशी झाली पाहिजे. हे बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासाठी वेळ कशाला काढता? आता सर्व प्रशासकीय संस्थांनी धडक कारवाई करण्याची गरज आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

त्या लोकांचा काय गुन्हा?

होर्डिंगमुळे मृत्यू झालेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय होता? शासन 5 लाख देईल? म्हणजे संपलं का? या प्रकरणाची चौकशी करुन कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. जितका आकार असायला हवा होता त्या पेक्षा खूप मोठा आकार होर्डिंगचा होता.

निवडणूक निकालासंदर्भात बोलताना छगन भुजबळ म्हणाले मी ज्योतिषी नाही. 4 जूनला किती वेळ राहिलाय. थोडा धीर धरायला काय हरकत आहे? पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले वक्तव्य म्हणजे निवडणुकीवर परिणाम व्हावा म्हणून वक्तव्य असणार आहे.