रत्नागिरी : भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात अनेक मार्गावरुन धावू लागली आहे. या गाडीची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी ती सुरु करण्याची मागणी केली जात आहे. आता महाराष्ट्रातून लवकरच चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली. तसेच मुंबईवरुन शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. आता चौथी गाडी मुंबई-गोवा सुरु होणार आहे. येत्या ३ जूनपासून ही गाडी धावणार असल्याने कोकणवासीयांना कमी वेळेत गावी जात येणार आहे.
पंतप्रधान दाखवणार हिरवा कंदिल
गेल्या काही दिवसांपासून कोकणवासीय आणि चाकरमान्यांना लागून राहिलेली उत्सुकता अखेर संपलीय आहे. कारण वंदे भारत एक्स्प्रेस ३ जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. ५ जूनपासून सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा कंदिल दाखवला जाणार आहे.
मुंबईतून कधी सुटणार ट्रेन
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. ठाण्याला सकाळी ६ वाजून ५ मिनिटाला पोहचणार आहे. पनवेल ही गाडी ६ वाजून ४० मिनिटांनी पोहचणार आहे.
कोकणात कधी दाखल होणार
कोकणात खेडला ही गाडी सर्वात आधी पोहचणार आहे. खेड रेल्वे स्थानकात ही गाडी सकाळी ८ वाजून 40 मिनिटांनी पोहचणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात ही गाडी १० वाजता पोहचणार आहे. दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी गाडी मडगावला पोहचेल.
परतीचा प्रवास कसा
परतीचा प्रवासात मडगाव येथून वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी २ वाजून 35 मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल. रत्नागिरी रेल्वे स्थानकात ही गाडी ५ वाजून 35 मिनिटांनी पोहचणार आहे. खेड रेल्वे स्थानकात ६ वाजून 48 मिनिटांनी पोहचणार आहे तर मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ला ही गाडी रात्री १० वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे.
बुकींग कधी सुरु होणार
या गाडीसाठी अजून बुकींग सुरु झाले नाही. परंतु एक-दोन दिवसांत आयआरसीटीसीच्या साईटवरुन बुकींग करता येणार आहे.
मुंबई ते गांधीनगर भाडे
मुंबई ते सोलापूर भाडे
हे ही वाचा
जूनपासून २८ राज्यांमध्ये धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई- गोवा कधी सुरु होणार