मुंबई : हे फोटो आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. मुंबईसारख्या (Mumbai)धकाधकीच्या शहरात, धकाधक वाढवते त्या लोकलमध्ये (Local Train) या वयात चॉकलेट विकून स्वाभिमानाने जगणाऱ्या या वृद्ध महिलेचं (Old Lady) कौतुक होत आहे. असं म्हणतात हे जीवन सुंदर आहे, पण हे जीवन जगताना, सुंदर जीवन टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष देखील करावा लागतो. खरंतर हे चित्र अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येतो आणि ज्यांना नैराश्यानं ग्रासलेलं असतं.
अशा लोकांकडून वस्तू खरेदी करण्यास काहीही हरकत नाही. हा व्हीडिओ 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या महिलेच्या जीवन जगण्याच्या संघर्षाचं सर्वत्र कौतुक होत आहे. काहींनी या महिलेला मदत करता येईल का म्हणून पत्ता देखील विचारलेला आहे.
लहानपण आणि तारुण्य एकवेळ तुमचं सुखात जावू शकतं, पण वृद्धापकाळ सुखात जावूच शकतो असं नाही. तुम्ही कितीही संपत्ती कमवली, तरी जीवनात त्या गोष्टीचा कधीच गर्व करु नका, कारण जीवनातली ही लढाई तुम्हाला शेवटी एकटीच लढायची आहे. रोज जगण्याची, धडपडण्याची लढाई लढताना, तुमच्याकडे ताकत असेलच असं नाही, पण तुम्हाला ही लढाई लढावी लागेल.
किसी की ज़िंदगी आराम है, संघर्ष किसी की ज़िंदगी का नाम है। ये महिला और इनके जैसे हज़ारों लोग जो मेहनत कर दो वक्त की रोटी कमाते हैं, हो सके तो उनसे सामान ज़रूर खरीदें। pic.twitter.com/zKXU3oIE8w
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) September 5, 2022
यामुळे तुम्ही कोणत्याही पदावर गेले, कितीही श्रीमंत असले, तरी कोणतंही काम, कोणत्याही वयात करण्याची तयारी ठेवा, कारण जीवनात तुमच्यावर कशी वेळ येईल हे काही सांगता येत नाही. नियतीने तुमच्यासमोर कसं ताट वाढून ठेवलं आहे, ते रिकामं असेल तरी ते भरण्याची कला कोणत्याही वयात तुमच्याकडे असावी.
तुमच्या जीवनातला डाव, कोणताही डाव… जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तो अर्ध्यावरच मोडणार आहे, फक्त तो डाव तुम्ही किती दिवस व्यवस्थित सांभाळून ठेवाल, हे तुमच्यावर असेल. या फोटोत दिसणाऱ्या महिलेचं सर्वत्र कौतुक होत आहे. कारण ती तिच्या जीवनात जिथे म्हणतात की आराम करण्याचा काळ आहे, तिथे पोट भरण्यासाठी संघर्ष करतेय. सॅल्यूट या महिलेला.