Tug of war | रस्सीखेच स्पर्धेत भाग घेऊन महापौर Kishori Pednekar यांनी दिला उपस्थितांना धक्का

Tug of war | रस्सीखेच स्पर्धेत भाग घेऊन महापौर Kishori Pednekar यांनी दिला उपस्थितांना धक्का

| Updated on: Feb 20, 2022 | 4:07 PM

मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी रस्सीखेच स्पर्धेचे (Competition) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावत थेट रस्सी स्वतःच्या हातात घेतली आणि उपस्थितांना थक्क करून टाकले.

मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी रस्सीखेच स्पर्धेचे (Competition) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावत थेट रस्सी स्वतःच्या हातात घेतली आणि उपस्थितांना थक्क करून टाकले. दक्षिण मुंबईतील डिलाइड रोड येथे भव्य रस्सीखेच स्पर्धा भरवण्यात आली आहे. येथील जागृती मंचाकडून या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ना. म. जोशी मार्गावरील महापालिकेच्या शाळेच्या आवारातील श्रमिक जिमखान्याच्या प्रांगणात ही स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेला महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार महापौरांनी हजेरी लावलीच. पण त्याचबरोबर स्वतः सहभागी होत स्पर्धेचे आयोजक आणि सहभागी सर्व संघ व क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का दिला. महापौर पेडणेकर यांनी आपली मुंबईच्या मातीशी व इथल्या मातीतील खेळांशी घट्ट बांधिलकी असल्याचे यावेळी दाखवून दिले. या स्पर्धेत एकूण 60संघांनी सहभाग घेतला आहे.