Maharashtra Rains and Weather News LIVE : मुंबईत दुपार नंतर पावसाची उघडीप

| Updated on: Dec 02, 2021 | 11:45 PM

महाराष्ट्राच्या (Maharashtra ) विविध जिल्ह्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावलेली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Maharashtra Rains and Weather News LIVE : मुंबईत दुपार नंतर  पावसाची उघडीप
Rain update
Follow us on

महाराष्ट्राच्या (Maharashtra ) विविध जिल्ह्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावलेली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई मध्ये पहाटे वेळी हळूहळू पाऊस (Mumbai Rains ) अनेक ठिकाणी सुरु होता. हवामान खात्याने मुंबई मध्ये यलो एलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळ मुळे पाऊस पडत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Dec 2021 05:09 PM (IST)

    निफाडमधील नांदूरमधमेश्वर धरणातून 1640 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

    नाशिक – नांदूरमधमेश्वर धरणातून 1640 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

    – गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने दुपारी तीनच्या सुमारास विसर्गाला सुरुवात

    – नाशिक परिक्षेत्रात होत असलेले अवकाळी पावसाचे पाणी नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने पाण्याचा विसर्ग

  • 02 Dec 2021 03:41 PM (IST)

    पालघर

    NCB चा पंच किरण गोसावीला 7 तारीखा पर्येंत पोलीस कस्टडी,

    केळवे सागरी पोलीस ठाण्यात गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल,

    आज गोसावीला पालघरच्या कोर्टात करण्यात आलं हजर,

    पालघर मधील दोन तरुणांची फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी आहे किरण गोसावी,

    नोकरीचा आमिष देऊन किरण गोसावी ने दोन तरुणांची केली फसवणूक


  • 02 Dec 2021 03:41 PM (IST)

    नवाब मलिक ऑन युपीए

    ममता बॅनर्जी युपीएच्या सदस्य असताना त्यांना बैठकीत बोलावण्यात आलं नाही हे सत्य आहे

    आम्हाला या देशात सगळ्या राजकीय पक्षांची एक मोठ बांधायचे आहे कॉंग्रेस सकट सगळे एकत्र आणायचे आहेत

    सामूहिक नेतृत्व तयार करून एक मोर्चा तयार करायचा आहे

    हा मोर्चा काम करेल काँग्रेस आमच्या सोबत राहणार आहे

    ज्यांना चिंता वाटते मग ममता सोबत राहणार काँग्रेससोबत जाणार

    तर त्यांनी लक्षात ठेवावं पवार साहेब हे असेच चाणक्य आहेत कि जे स्वतःला चाणक्य सांगत होते त्यांच्यावर मात देणारे ते चाणक्य आहेत

  • 02 Dec 2021 03:41 PM (IST)

     नबाब मलिक ऑन 2024 सत्ता

    पुलवामा ची घटना झाल्यानंतर तो आयडीएक्स कुठून आला आज पर्यंत त्याचा अहवाल सरकारने दिला नाही

    पुलवामा नंतर जी परिस्थिती या देशात निर्माण झाली त्याचा फायदा घेऊन भाजप या देशावर पुन्हा सत्तेत आलं

    सात वर्ष देशात सत्ता असताना आतंगवाद संपत नाही चीन सारखे देश या देशात नवीन गाव वसवतात

    2019 साली मोदींच्या कामगिरीचा नाहीतर पुलवामा च्या घटनेचा राजकीय फायदा भाजपने घेतला

    त्याच्या आधारावर ती भाजप सत्तेत आलं

    आज अनेक लोक भाजपवर नाराज आहेत

    2019 च उदाहरण देऊ नका 2024 ला या देशात मोदी सरकार राहणार नाही हे स्पष्ट आहे

  • 02 Dec 2021 03:40 PM (IST)

    नवाब मलिक ऑन फडणवीस

    ममता बनर्जी मुंबईच्या खासगी दौऱ्यावर असताना शिवसेना नेते आणि पवार साहेबांना भेटल्या

    गुजरातचे मुख्यमंत्री येतात, ते भाजपवाल्याना भेटतात तेव्हा आम्ही काही बोलत नाही

    वेगळी ट्रिटमेंट काही ममता बॅनर्जींना दिली नाही

    फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाकडे बघाव, आजच्या घडीला एनडीए मध्ये कोणी राहत नाही, भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झालेल आहे

    देशातील सर्व विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी पवारांनी घेतलेली आहे

    ममता बॅनर्जी आल्यावर याविषयावर चर्चा झाली

    आम्ही सर्व राजकीय पक्षांना काँग्रेस सोबत एक मोठी आघाडी या देशात निर्माण करुन जनतेला एक पर्याय उपलब्ध करुन देणार, त्याची चिंता भाजपने करु नये

    आमच्यात फुट पडली हे बोलण्यापेक्षा एनडीए मध्ये कोणी रहायला तयार नाही, नितीश बाबू कधी सोडुन जातील याकडे लक्ष द्या

    आम्ही आम्ही एकजुटीने सरकार चालवतो तुमची सरकार पडेल ही भविष्यवाणी कधीही खरी ठरलेली नाही आता जबाबदारी गोव्याची आहे त्यामुळे तिकडे लक्ष द्या

  • 02 Dec 2021 03:17 PM (IST)

    दादा भुसे

    – सहा पीक विमा कंपन्यांसोबत आढावा बैठक घेतली. 84 लाख शेतक-यांनी पीक विमा उतरवला. त्यापैकी 39 लाख शेतक-यांनी पिकाचे नुकसान झाल्याचे कळवले. ही संख्या विक्रमी आहे. 2312 कोटी विमा कंपन्यांकडे वर्ग. यात 441 कोटी हिस्सा हा शेतक-यांचा आहे.
    – पहिल्या टप्प्यातील 1400 कोटी रूपये पिक विम्यांपैकी 600 कोटी रूपये कंपन्यांनी शेतक-यांना अदा केलीय. उर्वरीत क्लेम अदा करण्यासाठी एक आठवड्यांचा अल्टिमेटम दिलाय.
    – सध्या होत असलेल्या पावसामुळं झालेल्या नुकसानीसंदर्भात शेतक-यांनी संबंधित विमा कंपन्यांना कळवावे.

  • 02 Dec 2021 03:14 PM (IST)

    दादा भुसे

    1 ते 7 डिसेंम्बर राष्ट्रीय पीक विमा सप्ताह साजरा केला जातो

    राज्यातील 6 विमा कंपन्यानी भाग घेतला त्यांच्यासोबत 3 तास चर्चा केली

    84 लाख शेतकऱ्यांनी विम्यात भाग घेतला

    जूनपासून अनेकदा पावसाने झालेलं नुकसान, खंड पडला

    त्यात अनेकानी नुकसान झाल्याचं कंपन्यांना कळवलं

    39 लाख शेतकऱ्यांनी सध्या कागदावर लिहून तहसील, विमा कंपनी, आणि बँकेत कळवलं तर ते ग्राह्य धरण आवश्यक आहे

    नुकसान भरपाई एका आठवड्यात देऊ

  • 02 Dec 2021 03:13 PM (IST)

    दादा भुसे

    सध्या कागदावर नुकसानीची माहिती दिली तरी ग्राह्य धरलं जाणार
    अवकाळी पावसाचा राज्यातील पिकांना मोठा फटका
    नुकसानीवर दादा भुसे यांची प्रतिक्रिया

  • 02 Dec 2021 03:11 PM (IST)

    नवाब मलिक

    भाजपची भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही
    आम्ही एकजुटीने सरकार चालवतो

  • 02 Dec 2021 03:03 PM (IST)

    नांदेड
    सोशलमिडीयावर पोस्ट टाकून 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या
    नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील तोरणा येथील घटना
    बागेश्वर नरवाडे अस गळफास लावून आत्महत्या केलेल्या युववकाचे नाव
    या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • 02 Dec 2021 03:03 PM (IST)

    नवी दिल्ली

    खासदार अरविंद सावंत

    # आज परिपूर्णपणे कोरोना विषय मांडला, 100 कोटी लसींचा डांगोरा पिटला, पण दुसरा डोस बाबत अजूनही काम झालं नाही, आमच्या मागण्या रास्त होत्या, आता केंद्राने सुधाराव ही अपेक्षा – सावंत

    # नियमावली बाबत केंद्र दुजाभाव करतय, देशात कोरोना आल्यावर महाराष्ट्र राज्यावर मोठा प्रभाव होता त्यावेळी आमच्या CM आणि त्यांच्या कार्याच कौतुक झालं, यात केंद्राला काय कमीपणा वाटतो ? खासदार सावंत यांचा सवाल

    # ममता दौऱ्यात राजकिय अजेंडा असला तर त्यात गैर काय ? यूपी मध्ये तुमचं काय सुरू आहे ? सावंत यांचा भाजपला टोला

    # ममतांनी शौर्य गाजवलं आहे, तुम्ही सांम, दाम, दंड वापरला तरी त्यांनी शौर्य दाखवलं, सेनेच्या बाबत ममतांच्या मनात प्रेम आहे, कंगनाच्या स्वागतापेक्षा हे स्वागत बरं

    # आज मनात आहे, उद्धवजी आज घरी आले

  • 02 Dec 2021 03:02 PM (IST)

    हिंगोली

    दोन मुल आणि बायकोने मिळुन केला नवऱ्याचा खून

    पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला

    घरगुती कारणातून केला खून

    कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील घटना

    घटनास्थळी बाळापूर पोलीस दाखल..

  • 02 Dec 2021 03:02 PM (IST)

    सातारा

    सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी दरड कोसळली

    वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटामध्ये दरड कोसळली…

    मांढरदेवी घाटात ही दरड कोसळली मात्र ती हटविण्यात आली आहे

    दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला दरड हटविण्याचे काम सुरु

  • 02 Dec 2021 03:02 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस

    आम्ही प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले

    ममता दीदी आल्या त्यांचे स्वागत पण भाजपचा मुख्यमंत्री आला की टीका केली जाते

    ही दुटप्पी भूमिका

    ममता दीदी थेट बोलतात आणि पवार बिट विन द लाईन बोलतात

    दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचे आहे

    राज्यात कॉग्रेसला घेतल्या शिवाय राष्ट्रवादीकडे पर्याय नाही

    शिवसेनेने गुप्त भेट केली तरी काही फायदा होणार नाही

    संजय राऊत इतक्या मोठ्या बाता करतात पण त्यांचे 56 आमदार आहेत

    शिवसेनेने कितीही लांगून चालन केले काही फायदा होणार नाही

    शिवसनेचे बेगडी सावरकर प्रेम दिसुन आले आहे

    आज त्यांच्या पक्षाचे खासदार अपमान करत आहेत

    सावरकर हे कायमच भारतरत्न आहेत

    शिवसेनेचे बेगडी प्रेम समोर येत आहे

    आम्ही प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले

    ममता दीदी आल्या त्यांचे स्वागत पण भाजपचा मुख्यमंत्री आला की टीका केली जाते

    ही दुटप्पी भूमिका

    ममता दीदी थेट बोलतात आणि पवार बिट विन द लाईन बोलतात

    दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचे आहे

    राज्यात कॉग्रेसला घेतल्या शिवाय राष्ट्रवादीकडे पर्याय नाही

    शिवसेनेने गुप्त भेट केली तरी काही फायदा होणार नाही

    मुंबईत वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येत असतात

    राज्य हे औद्योगिक दृष्टया मजबूत राज्य आहे

    आपण फार मोठे आहोत असा विचार राज्याने करू नये

    मुख्यमंत्री येतात आणि अपील करतात

    कालचा दौरा मूळ अजेंडा राजकीय होता

    2024 देखील मोदींचे असेल. हे प्रयोग 2019 साली देखील झाले

    2024 साली लोक मोदी यांच्यावर विश्वास ठेवतील

    काँग्रेसला बाजूला ठेवून ममता दीदी मोट बांधत आहेत

    आणि पवारांची त्याला साथ आहे

    शिवसनेचे बेगडी सावरकर प्रेम दिसुन आले आहे

    आज त्यांच्या पक्षाचे खासदार अपमान करत आहेत

    सावरकर हे कायमच भारतरत्न आहेत

    शिवसेनेचे बेगडी प्रेम समोर येत आहे

    संजय राऊत इतक्या मोठ्या बाता करतात पण त्यांचे 56 आमदार आहेत

    शिवसेनेने कितीही लांगून चालन केले काही फायदा होणार नाही

    गृहमंत्र्यांना कल्पना नाही याबद्दल मला का विचारता

    माझ्या काळात मला सर्व माहीत आहे

  • 02 Dec 2021 11:52 AM (IST)

    महाराष्ट्राला पाऊस आणि वादळाचा धोका, आज उद्या राज्यात पाऊस कायम राहणार

    महाराष्ट्राला पाऊस आणि वादळाचा धोका

    आज उद्या राज्यात पाऊस कायम राहणार

    आंध्रप्रदेश आणि ओडिशाला जोवाड चक्रीवादळाचा धोका

    आज चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस

    कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रला पावसाचा धोका

  • 02 Dec 2021 11:22 AM (IST)

    पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मेंढ्यांचा मृत्यू

    पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मेंढ्यांचा मृत्यू

    500 हुन अधिक मेंढ्यांचा झाला मृत्यू

    23 गावांमध्ये झाला मेंढ्यांचा मृत्यू

    पाऊस आणि खराब हवामानामुळे मृत्यू झाल्याच मेंडपाळांच म्हणणं

    मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान

  • 02 Dec 2021 11:21 AM (IST)

    थंडी आणि पावसाने घेतला मेढ्यांचा बळी

    थंडी आणि पावसाने घेतला मेढ्यांचा बळी…
    अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरची घटना…
    थंडीने दहा मेढ्यांचा झाला मृत्यू…
    चौदा मेंढ्या अजूनही अत्यवस्थ…
    संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ येथील घटना…
    अचानक वाढलेली थंडी आणि पावसाने मेढ्यांचा घेतला बळी…
    पशुवैद्यकीय अधिकारी आणि तलाठी घटनास्थळी…

  • 02 Dec 2021 09:35 AM (IST)

    रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस

    रत्नागिरी- सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस

    अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता

    किनारपट्टी भागामध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची रिमझिम

    जिल्ह्यातील मासेमारी पूर्णपणे ठप्प

    अरबी समुद्र किनारपट्टी वरील टॉप बँगल्स दृश्य tv9 वर

    किनारपट्टी भागात ढगांची दाटीवाटी

    समुद्र देखील खवळलेला

  • 02 Dec 2021 09:01 AM (IST)

    पुढील तीन तासात मुंबई ते सिंधुदुर्ग, कोल्हापूर पुणे नाशिकमध्ये पावसाची शक्यता

    ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. ए. होसाळीकर यांनी राज्यात पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये रायगड, ठाणे, मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

  • 02 Dec 2021 08:52 AM (IST)

    रत्नागिरीत अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका आंबा पिकला

    रत्नागिरी – अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका आंबा पिकला

    अवकाळी पावसाने आलेला मोहर गेला गळून

    आंबा हंगाम लांबण्याची शक्यता

    आंब्याच्या झाडा वरती आलेले छोटी कैरी सुद्धा गेली गळून

    अवकाळी पावसामुळे मोहरावर तुडतुडे आणि बुरशीकहा प्रादुर्भाव

  • 02 Dec 2021 08:51 AM (IST)

    नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पावसाचा फटका

    नाशिक -नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पावसाचा फटका

    मोकळ्या जागेवर होणाऱ्या कार्यक्रमांच्या जागा बदलल्या

    तर मुख्य कार्यक्रमस्थळी देखील पावसाचे पाणी साचले

    भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात उद्या पासून 3 दिवस होणार साहित्य संमेलन

  • 02 Dec 2021 08:50 AM (IST)

    कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाने ऊसतोड मजुरांची दैना

    कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाने ऊसतोड मजुरांचे पालांची केली दैना

    रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमध्ये शिरल पाणी

    ऊस तोड मजूराना मुलाबाळांसह राहावं लागतंय चिखलात

    ऊस तोडी ही खोळंबल्या

  • 02 Dec 2021 08:21 AM (IST)

    नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार

    नाशिक -सलग दुसऱ्या दिवशी नाशिक मध्ये पावसाची संततधार

    या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती

    उद्यापासून होणाऱ्या संमेलनावर देखील होणार परिणार

    पावसामुळे मुख्य मंडपात पाणी आणि चिखल साचल्याने आयोजक चिंतेत

    उद्या सकाळी होणाऱ्या ग्रंथदिंडी कार्यक्रम नंतर संमेलनाला होणार आहे सुरवात

    सुरू असलेल्या या पावसामुळे संमेलनात खुल्या जागी होणारे अनेक कार्यक्रम देखील अडचणीत

  • 02 Dec 2021 08:00 AM (IST)

    ढगाळ वातावरणामुळे कांद्याची प्रत घसरली

    सोलापुर — ढगाळ वातावरणामुळे कांद्याची प्रत घसरली तर दक्षिण भारतातील पावसाने बाजार घसरला

    बाजार समितीत विकल्या गेलेल्या कांद्याला सरासरी आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटल इतका चालू हंगामातील नीचांकी भाव

    खरीप कांदाला झालेला प्रचंड उत्पादन खर्च व प्रतिकूल हवामानामुळे घसरलेली एकरी उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या

    नवीन कांद्याला ही सरासरी 2100 ते 2800 रुपये मिळत होता दर आणखीन वाढ होण्याची होती शक्यता

    मात्र ढगाळ वातावरण आणि दक्षिण भारतातील पावसाने अंदाज ठरविला फोल

  • 02 Dec 2021 07:59 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र काल सायंकाळ पासून पाऊसाची रिपरिप

    नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र काल सायंकाळ पासून पाऊसाची रिपरिप सुरू आहे.
    तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे कापूस आणि कापलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच मिरची पथारी वर टाकलेली मिरची चे नुकसान झाले आहे.

  • 02 Dec 2021 07:58 AM (IST)

    रत्नागिरीत समुद्रातील वेगवान वाऱ्याने अडवली मच्छिमारांची वाट

    रत्नागिरी- समुद्रातील वेगवान वाऱ्याने अडवली मच्छिमारांची वाट
    कोकण किनारपट्टीवरची मच्छिमारीला ब्रेक
    समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि वादळी परिस्थितीमुळे मच्छिमारी ठप्पा
    रत्नागिरी जिल्ह्याचील साडेतीन हजार मच्छिमारी नौकांपैकी ९५ टक्के मच्छिमारी बोटी किनाऱ्याला
    मच्छिमारांनी खोल समुद्राच जावू नये प्रसासनाचा देखील इशारा
    मिरकरवाडा, राजीवडा, साखरीनाटे, जयगड, हर्णे बंदरात अनेक नौका किनाऱ्याला

  • 02 Dec 2021 07:55 AM (IST)

    औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात सर्वदूर ढगाळ वातावरण

    औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात सर्वदूर ढगाळ वातावरण

    ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

    मराठवाड्यात गेल्या दहा दिवसांपासून ढगाळ आणि पावसाचे वातावरण

    खराब हवामानामुळे रब्बी पिकाला बसतोय मोठा फटका

    अनेक ठिकाणी पावसामुळे शेती कामाला लागली खीळ

  • 02 Dec 2021 07:54 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटे पासून जोरदार पावसाच्या सरी

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटे पासून जोरदार पावसाच्या सरी

    गेले दोन दिवस सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस आणि दिवसभर ढगाळ वातावरण

    हवामान विभागाकडून दिलाय यलो अलर्ट

    सततचा पाऊस आणि हवामान बदलाचा आंबा आणि काजू पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता

  • 02 Dec 2021 07:30 AM (IST)

    पुण्यात मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती

    पुण्यात मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती

    ढगाळ वातावरणामुळे गारठा वाढला

    पुढील दोन दिवस पुणे आणि परिसरात पावसाची शक्यता

  • 02 Dec 2021 07:25 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात रात्रभर पावसाची रिपरिप

    रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात रात्रभर पावसाची रिपरिप
    पहाटेपासून पावसाची विश्रांती, अधुन मधून पावसाच्या सरी

    अरबी समुद्रातील कमी दाब्याच्या पट्यामुळे कोकणाला आँरेज अलर्ट

    पुढील दोन दिवस मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता

  • 02 Dec 2021 07:08 AM (IST)

    वसई विरार नालासोपाऱ्यात संपूर्ण ढगाळ वातावरण

    वसई विरार नालासोपाऱ्यात संपूर्ण ढगाळ वातावरण आहे.. पहाटे पासून पाऊस थांबला आहे..

  • 02 Dec 2021 06:39 AM (IST)

    सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात रात्री 8 वाजल्यापासून मुसळधार पाऊस

    हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण तसेच काही भागात तुरळक पावसाच्या सरी पहायला मिळाल्या मात्र जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये तीन तासापासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे ओढे नाले भरून वाहू लागले आहेत.  पश्चिम भागातील महाबळेश्वर, वाई ,जावली, सातारा, पाटण, कराड याठिकाणीही मुसळधार पाऊस सुरू आहे या अवेळी पडत असलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीसह गहू हरभरा ज्वारी या पिकांना फटका बसणार आहे.

  • 02 Dec 2021 06:35 AM (IST)

    प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून जारी करण्यात आलेला हवामानाचा अंदाज

    प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून जारी करण्यात आलेला हवामानाचा अंदाज