मुंबई : महाराष्ट्र सध्या महापूर, दरड कोसळणे आणि भूस्खलनासारख्या विविध आपत्तींचा सामना करत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे आणि दरड कोसळल्याने आपत्ती ओढवली आहे. ज्या ठिकाणी संरक्षक भिंती असूनही नुकसान झाले, अशा आणि इतर धोकादायक ठिकाणी आयआयटीच्या तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून विविध पर्याय सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी आज मुंबई उपनगर जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांचा वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, सबंधित विभागातील महानगरपालिकेचे सहायक आयुक्त उपस्थित होते. (Aditya Thackeray reviews disaster prevention measures in Mumbai suburbs)
पावसामुळे आपत्ती ओढवलेल्या मुंबई उपनगरातील ठिकाणांची मागील आठवड्यात प्रत्यक्ष पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली. त्यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी या जागा अतिशय धोकादायक असल्याने जिथे मागणी आणि आवश्यकता आहे तिथे तातडीने संरक्षक भिंत बांधण्याची सूचना केली. तसंच संरक्षक भिंतींचा उपयोग होणार नाही अशा ठिकाणी तज्ज्ञांमार्फत इतर पर्यायांचा अभ्यास करावा, असंही सांगितलं. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह महानगरपालिका, एमएमआरडीए, वन विभाग, म्हाडा आदी विभागांनी समन्वयाने काम करावं आणि वस्त्या असलेल्या ठिकाणांना प्राधान्य द्यावं, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
2) Expediting all pending backlog of landslide protection walls to keep no request pending by 2022-2023. Last year and this year also we have cleared maximum requests
3) Work on auditing the vulnerability of the region and alternate plans for the same pic.twitter.com/xC6sEwUhzM— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 26, 2021
राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत. समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे. समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.
चिपळूण, महाड आदी ठिकाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं होतं. सांगली आणि कोल्हापुरात अद्यापही घरांमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. घरातील सर्व साहित्य, दुकानातील सामान पूर्णत: वाया गेलं आहे. अशावेळी राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
राज ठाकरेंचा मलाही फोन, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही भेटणार : सुधीर मुनगंटीवार
…तर मुंबईतील हे तीन आमदार नगरसेवकपदाचंही मानधन घेतात
Aditya Thackeray reviews disaster prevention measures in Mumbai suburbs