लोकसभा निकालाच्या मतमोजणीचा ठाकरे गटाने घेतला धसका ?

| Updated on: Jul 01, 2024 | 9:56 AM

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाली असून थोड्याच वेळात कल हाती येण्यास सुरूवात होईल.

लोकसभा निकालाच्या मतमोजणीचा ठाकरे गटाने घेतला धसका ?
Follow us on

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाली असून थोड्याच वेळात कल हाती येण्यास सुरूवात होईल. मात्र लोकसभा निकालाच्या मतमोजणीचा ठाकरे गटाने धसका घेतल्याचे दिसत आहे. तशीच काहीशी पुनरावृत्ती होऊ नये आणि शिक्षक आणि पदवीधर मतदानाच्या मतमोजणीवेळी चुकीचा प्रकार होऊ नये, यासाठी ठाकरे गटाचे मोठमोठे नेते मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत.

मुंबई पदवीधरमध्ये उद्धव सेनेचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत आहे. तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात सामना रंगला आहे. नेरुळ नवी मुंबई येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर या तीन मतदार संघाची मतमोजणी पार पडत आहे. लोकसभा निकालावेळी मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात मतमोजणी वेळी फेरफार केल्याचा ठाकरे गटाने आरोप केला होता. यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला होता. तसाच काहीसा प्रकार आजही घडू नये यासाठी शिवसेनेच्या वतीन खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत.

अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

ही निवडणूक चौरंगी हो ईल असे सुरूवातीला वाचत होते, पण आता ती एकतर्फी झाली आहे. शिक्षकांचा कौल माझ्या बाजूने आहे. सत्ताविरुद्ध सत्याची निवडणूक होती आणि सत्याचा विजय होईल असा विश्वास नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला. शंकररावजी कोल्हे साहेबांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता. प्रेमाने लोक जोडले, पक्षविरहित भक्कमपणे साथ दिली. मला खात्री आहे की माझाच विजय होईल, असं ते म्हणाले. सर्व पक्षीय लोकांचे, मतदारांचा, सर्वांची मला साथ लाभली आहे.

निश्चितपणे काही गोष्टी दुर्दैवी आहेत . सत्तेचा दुरुपयोग विद्यामन आमदारांनी केल्याचं जाणवलं. मात्र निवडणुका झाल्यावर आम्ही सगळ्या गोष्टी विसरून जाऊ आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू असे कोल्हे म्हणाले.

किशोर दराडेंना काही टेन्शन नाही

मला काहीच टेन्शन नाही असे सांगत महायुती शिंदें गटाचे किशोर दराडे यांनीही या निवडणुकीतील विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. गेल्या सहा वर्षापासून या मतदारसंघात काम केल्याने नक्कीच माझा विजय होईल. मला टेन्शन नाही. विरोधकांकडे काही मुद्दाच नाही. मतदान नोंदवताना सगळ्या शासनाच्या प्रोसेस राबवल्या गेल्या आहेत , बोगस मतदान काही झालेलं नाही , विरोधकांना काही मुद्दे नसल्याने ते असं करत आहेत . गेल्या सहा वर्षात मी शिक्षकांची सेवा केली सगळे शिक्षक माझ्यासोबत आहेत 110% माझा विजय होईल, असं दराड म्हणाले.