मुंबई : देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सलग चौथ्या दिवशी राज्यात कोरोना आकडेवारीने शंभरी पार केली आहे. महाराष्ट्रा (Maharashtra)त शुक्रवारी 121 नवीन कोरोना रुग्णां (Patients)ची नोंद झाली आहे. यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण रुग्णसंख्या 7,876,503 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बातमीही आहे. राज्यात आज कोणत्याही मृत्यूची नोंद झाली नाही. शुक्रवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, लातूर, उस्मानाबाद, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा येथे एकही सक्रिय रुग्ण आढळला नाही, असे राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले. (121 new cases have been registered today in the state, while 68 new coronaviruses have been reported in Mumbai)
सलग चौथ्या दिवशी महाराष्ट्रात एकाच दिवसात 100 हून अधिक नवीन रुग्ण आढळले; गुरुवारी 179 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, तर 19 आणि 20 एप्रिलला संबंधित संख्या अनुक्रमे 137 आणि 162 होती. दरम्यान, शुक्रवारी गेल्या 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 7,727,855 इतकी झाली आहे. म्हणजेच राज्याचा बरे हण्याचा रेट 98.11 टक्के आहे.
राजधानी मुंबईत आज 68 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी मुंबईची रुग्णसंख्या 91 झाली होती. आतापर्यंत मुंबईत एकूण 1,058,2019 रुग्णसंख्या नोंद झाली आहे, जी राज्याच्या एकूण संख्येच्या 13 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अलिकडच्या काळात, देशातील दैनंदिन कोरोना प्रकरणांमध्ये, विशेषत: दिल्लीसह काही राज्यांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे राज्य सरकारांना मास्क सक्तीच्या आदेशासह निर्बंध पुन्हा लागू करण्यास प्रवृत्त केले गेले आहे. महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिलपासून मास्कबाबत प्रतिबंध हटवले आहेत. (121 new cases have been registered today in the state, while 68 new coronaviruses have been reported in Mumbai)
#Maharashtra #COVID19 Updates for today
121 new cases have been reported in the state today
State tally of #COVID positive patients is now 78,76,503
District-wise details of cases and deaths until today are as follows:@airnews_mumbai@airnews_nagpur
(3/4)? pic.twitter.com/IbXl3yerzU
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 22, 2022
इतर बातम्या