मुंबई : बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईत (Crime News) घडली आहे. या घटनेमुळे धक्का बसलेल्या मुलीने आत्महत्या (suicided note) केली आहे. बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केला आहे. यानंतर १४ वर्षीय मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात ही घटना घडली. मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी ही घटना आईला सांगितली होती. परंतु आईने तिची दखल घेतली नव्हती. यामुळे मुलीने जीवन संपवले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईत १४ वर्षाच्या मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही मिळाली.
काय झाले होते त्यामुळे मुलीने संपवले जीवन
पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरु केला आहे. पोलिसांना घटनास्थली मिळालेल्या सुसाइट नोटची तपासणी सुरु केली आहे. सुसाइट नोटमध्ये आत्महत्येचे कारण दिले आहे. त्यात वडिलांनी मुलीवर अत्याचार केल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे आपण आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.
आईकडे केली होती तक्रार
मुलीने आपल्या सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे की, वडिलांनी अत्याचार केल्याची माहिती आईलाही दिली. परंतु आईने काहीच केले नाही. त्यानंतर वडिलांकडून असा प्रकार सुरुच राहिला. यामुळे मी आत्महत्या करत आहे. मुलीने सुसाइट नोटमध्ये वडिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. तसेच प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.