मुंबई : पुणे जिल्ह्यात ४३ शाळा बोगस (Pune School) आढळल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये धक्कादायक माहिती समोर मिळाली होती. या बोगस ४३ पैकी ३० शाळा कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. पुण्यातील या प्रकारानंतर मुंबईतील शाळांची (Mumbai School) माहिती समोर आली आहे. मुंबईत तब्बल २६९ शाळा बेकायदेशीर (Bogus School Scam) आहेत. त्यांना नोटीस देऊनही त्यांचा कारभार सुरु आहे. कुर्ला, माटुंगा, वडाळा सायन भागात सर्वाधिक बेकायदा शाळा आहेत.
आधी पुण्याची चर्चा
पुण्यात अनधिकृत शाळांनी बस्तान मांडल्याचे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले असतानाच मुंबईतही २६९ अनधिकृत शाळांचा थाटात कारभार सुरु असल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या १० वर्षांपासून या शाळा सुरु आहेत.
या २६९ अनधिकृत शाळांचा पालिका प्रशासनाने नोटीस बजावण्याचा सोपस्कार केला आहे. यामुळे त्या सर्व शाळा व्यवस्थापनांनी पालिकेच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली आहे.
मुलांच्या भवितव्याशी खेळ
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. मात्र शिक्षणाच्या नावाखाली मुंबईत बेकायदा शाळा व्यवस्थापकांनी शैक्षणिक बाजार मांडला आहे. मुंबईत दहा, वीस नव्हे तर तब्बल २६९ शाळा बेकायदेशीर आहे. पुण्यातील ४३ शाळांच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे. या शाळांच्या व्यवस्थापनाने आपली दुकाने थाटून मोठी कमाई सुरु केली आहे.
त्यामुळे लाखो मुलांच्या शैक्षणिक जीवनाशी खेळ सुरु आहे. परंतु शासनाकडे सर्व अधिकार असताना एकही मोठी कारवाई झाली नाही. मुंबईतील माटुंगा वडाळा, सायन आदी भागात बेकायदा शाळांची संख्या सर्वाधिक आहे.
शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारची कारवाई या शाळेंवर करता येत नाही. महापालिका प्रशासन फक्त या शाळेंना नोटीसच देऊ शकते.
पुण्यात काय झाले
पुणे जिल्ह्यात सीबीएसई अभ्यासक्रमाशी संलग्नित शाळांच्या मान्यताबाबतच्या विविध “एनओसी’ची माहिती देण्यास बहुसंख्य शाळांकडून लपवाछपवी सुरू आहे. यात शालेय शिक्षण विभागाकडे केवळ 40 टक्केच शाळांकडून माहिती जमा झालेली आहे. यातील उर्वरित शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांकडून नोटीस बजावली गेली आहे. शाळांच्या “एनओसी’बाबत माहितीचा शिक्षण आयुक्त कार्यालयाने विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून आढावा घेतला. यात 60 टक्के शाळांकडून अद्यापही माहिती दाखल झाली नसल्याची बाब पुढे आली.
मुंबईतील सर्वाधिक अनधिकृत शाळा कुठे