शासकीय अधिकाऱ्यांसाठी अनुकंपा नियुक्तीचे धोरण, आशा सेविकांचा मोबदला वाढवला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय

| Updated on: Aug 26, 2021 | 5:25 PM

शासकीय अधिकाऱ्यांना देखील अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू करण्यात आले आहे, निधन झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास नियुक्ती दिली जाणार आहे. याबाबतचा निर्णय आज (26 ऑगस्ट) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

शासकीय अधिकाऱ्यांसाठी अनुकंपा नियुक्तीचे धोरण, आशा सेविकांचा मोबदला वाढवला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय
cm-uddhav-thackeray-with-mantralay-photo
Follow us on

मुंबई : शासकीय अधिकाऱ्यांना देखील अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू करण्यात आले आहे, निधन झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास नियुक्ती दिली जाणार आहे. याबाबतचा निर्णय आज (26 ऑगस्ट) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी आशा स्वंयसेविका आणि गट प्रवर्तकांचा मोबदला वाढवण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण सहा महत्त्वाचे निर्णय घेतले. (6 important decisions taken in meeting of Maharashtra State Cabinet)

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील सहा महत्त्वाचे निर्णय

  • शासकीय अधिकाऱ्यांना देखील अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू. निधन झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास नियुक्ती देणार (सामान्य प्रशासन)
  • कुटुंब न्यायालयातील सरळसेवेने नियुक्त न्यायाधीशांना जिल्हा न्यायाधीश (प्रथम प्रवेश, निवड श्रेणी, उच्च समयश्रेणी) वेतनश्रेणी लागू (विधि व न्याय विभाग)
  • राज्य तंत्रशिक्षण मंडळ, अधिनियम-1997 मधील कलमांमध्ये सुधारणा (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
  • आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तकांचा मोबदला वाढवला (सार्वजनिक आरोग्य विभाग)
  • केंद्राच्या योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनाबाबत बँक खाती उघडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा (वित्त विभाग)
  • कृषी आधारीत व अन्न प्रक्रिया उद्योगांना सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मोठ्या व विशाल प्रकल्पांसाठी विहीत गुंतवणूक, रोजगाराचे निकष आणि प्रोत्साहने सुधारीत करणार (उद्योग विभाग)

इतर बातम्या

कोव्हिडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न, त्याला तोंड देऊ शकलो नाही तर मोठे संकट निर्माण होईल: मुख्यमंत्री

(6 important decisions taken in meeting of Maharashtra State Cabinet)