गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : गोरेगावच्या उन्नत नगरमधील एसआरएच्या जय भवानी इमारतीत काल मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 51 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 35 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकष्ठा करत ही आग आटोक्यात आणली असून सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
गोरेगावच्या उन्नत नगर येथील आझाद मैदानाजवळील जय भवानी या एसआरएच्या इमारतीला काल मध्यरात्री 3 वाजता भीषण आग लागली. आग लागली तेव्हा इमारतीतील सर्वजण गाढ झोपेत होते. अचानक धुराचे लोट घरात शिरला. काळाकुट्ट धूर नाका तोंडात गेल्याने अनेकांना श्वसनाचा त्रास झाला. काहींना ठसका लागला.
तर आगीच्या लोळामुळे अनेकांना अचानक उष्णता वाढल्याचं लक्षात आलं. अचानक झालेल्या या प्रकाराने नागरिक घाबरले. घराची खिडकी उघडून पाहताच धुराचे लोटच्या लोट घरात आल्याने सर्वच घाबरले. त्यामुळे घरातील लोक जीवमुठीत घेऊन इमारतीच्या खाली पळत सुटले. यावेळी अनेकांना पळताना मुका मारही लागला.
या सर्व धावपळीत एकूण 51 जण जखमी झाले. काहींना मार लागला. तर काहींना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या सर्वांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय आणि कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
तर 35 जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले. रात्रीच्यावेळी गाढ झोपेत असलेले 7 जण मात्र या आगीत दगावले. दगावलेल्यांमध्ये तीन महिला, दोन मुलं आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. सोसायटीच्या पार्किंगमध्ये चिंध्या मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आल्या होत्या. त्यालाच आग लागल्याने ही आग अधिक पसरल्याचं अग्निशमन दलाने स्पष्ट केलं.
दरम्यान, गोरेगाव (पश्चिम) येथील आगीच्या दुर्दैवी घटनेतील रुग्णांची विचारपूस करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे आज सकाळी 10.30 वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय आणि त्यानंतर कूपर रुग्णालय येथे जाणार आहेत.
1) त्रिशा चौगुले – वय 18 वर्षे
2) नंदा ओजिया – वय 50 वर्षे
3) दिया बिमार – वय 12 वर्षे
4) टिंकल विजय – वय 3.5 वर्षे
5) विष्णू आले – वय 45 वर्षे
6) 01 अनोळखी मत
1) प्रेरणा डोंमरे वय 19 वर्षे
1) 12 पुरुष
2) 16 महिला
3) 01 मुलगी
4) 01 मुलगी
एकूण :- 30 उपचार घेत आहेत .
कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले एकूण रुग्ण 15