Independence Day Live Updates : कोरोनाचे नियम पाळा, लवकर कोरोनाला हद्दपार करु- उद्धव ठाकरे

| Updated on: Aug 15, 2021 | 5:21 PM

 पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन तिरंगा ध्वज फडकावला. तब्बल 1 तास 38 मिनिटे त्यांनी देशातील जनतेला संबोधित केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ कोविड नियमांच्या पालनासह पार पडला.

Independence Day Live Updates : कोरोनाचे नियम पाळा, लवकर कोरोनाला हद्दपार करु- उद्धव ठाकरे
Cm Uddhav Thackeray
Follow us on

75th independence day of india 2021 Live updates : भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन…. संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन तिरंगा ध्वज फडकावला. तब्बल 1 तास 38 मिनिटे त्यांनी देशातील जनतेला संबोधित केलं. तर मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा, असं आवाहन करताना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Aug 2021 05:10 PM (IST)

    जळगावात शिंदाड येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 वर्षांच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सत्त्कार

    जळगाव : देशभरात सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचा 75 वा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. याच दिनाचे औचित्य साधत पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे 75 वर्षांच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा रुमाल तसेच गुलाबाचे पुष्प देऊन सत्त्कार करण्यात आला. या उपक्रमाने सर्व ज्येष्ठ नागरिक भारावले होते.

  • 15 Aug 2021 05:07 PM (IST)

    नांदेडमध्ये सुवर्ण कामगारांनी काढली तिरंगा रॅली

    नांदेड : स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने नांदेडमध्ये आज सुवर्ण कामगारांनी तिरंगा रॅली काढली.

    भव्य दिव्य तिरंगा झेंड्याची ही रॅली पाहण्यासाठी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती.

    देशभक्तीच्या जोरदार घोषणाबाजीमुळे तिरंगा रॅली आकर्षण ठरली होती.

    यावेळी अनेकांनी या रॅलीचे स्वागत केलं.


  • 15 Aug 2021 05:05 PM (IST)

    मूर्तीजापूर येथील क्रीडा संकुलात उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण

    अकोला : जिल्हातल्या मूर्तीजापूर येथील क्रीडा संकुल येथे मूर्तीजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

  • 15 Aug 2021 09:17 AM (IST)

    पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, सगळ्यांनी निश्चय करा- उद्धव ठाकरे

    पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा

    नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला घालवू शकतो

  • 15 Aug 2021 09:15 AM (IST)

    लसीकरणाने वेग घेतलाय, काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण

    लसीकरणाने वेग घेतलाय… काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण… राज्यात लसीकरणाचा उच्चांक….

    आपण एक निश्चय करु,  मी माझं राज्य, देश कोरोनामुक्त करणारच!

  • 15 Aug 2021 09:13 AM (IST)

    …तर नाईलाजाने आपल्याला लॉकडाऊन लावावं लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    कोरोनाचं संकट घोंघावतंय… आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय… आरोग्य सुविधा आपण वाढवतोय… शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत… ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल

  • 15 Aug 2021 09:11 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

    ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझं वंदन

    महापुरुषांनी स्वराज म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगितला

    मला अभिमान आहे, महाराष्ट्रातील 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकं मिळाली

  • 15 Aug 2021 08:48 AM (IST)

    RSS सरसंघचालकांच्या हस्ते मुंबईत ध्वजारोहण

  • 15 Aug 2021 08:06 AM (IST)

    पहिल्यापेक्षा विकासाचा वेग वाढलाय, पण गोष्ट इथेच संपत नाही- मोदी

  • 15 Aug 2021 07:37 AM (IST)

    पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

  • 15 Aug 2021 07:29 AM (IST)

    ‘माँ तुझे सलाम….’, ITBP जवानांकडून स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा

  • 15 Aug 2021 07:27 AM (IST)

    पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर दाखल

  • 15 Aug 2021 07:26 AM (IST)

    पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधींना आदरांजली

  • 15 Aug 2021 07:11 AM (IST)

    ऑलिम्पिकवीर खेळाडू लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला पोहोचले

  • 15 Aug 2021 07:09 AM (IST)

    राजधानी नवी दि्ललीतील काही क्षणचित्रे

  • 15 Aug 2021 07:05 AM (IST)

    स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेला आकर्षक रोषणाई

    स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई नवी मुंबईकरांचे मन मोहून घेत आहे. त्याचबरोबर पनवेल येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या आयकर भवनची विद्युत रोषणाई देखील मन मोहून घेत आहे.