मुंबई: मुंबई पोर्ट आणि हेरिटेज लाईटहाऊस यांच्या सुंदर साक्षीने मुंबईतील डॉमेस्टिक क्रूज टर्मिनल येथे आठवा आंतरराष्ट्रीय समुद्र मंथन पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला हा पुरस्कार सोहळा समर्पित होता.
देशाचे पर्यटन तसंच बंदर, जहाज आणि जलमार्ग (पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज) खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी या पुरस्कार सोहळ्याला व्हर्च्युअली शुभेच्छा दिल्या. ‘जेएनपीटी’चे अध्यक्ष संजय सेठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या या सोहळ्यात वयाची शंभरी ओलांडलेले कॅप्टन जे. सी. आनंद यांचा भारतीय सागरी क्षेत्राला त्यांनी केलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. संजय सेठी यांच्या हस्ते ‘टग यूज इन पोर्ट’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
कॅप्टन जे.सी. आनंद यांनी शंभरी गाठली असून भारतीय सागरी उद्योगातील त्यांच्या महान योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगचे अध्यक्ष अरुण शर्मा यांना “जीवनगौरव पुरस्कार” देण्यात आला. मायकेल पिंटो, आयएएस (निवृत्त) हे सेक्रेटरी शिपिंग म्हणून निवृत्त झाले होते. त्यांना आणि आणखी एका दिग्गज व्यक्तिला “लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड” प्रदान करण्यात आला.
निवृत्त सनदी अधिकारी, ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’चे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उप-लोकायुक्त संजय भाटिया हे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष होते. “समुद्र मंथन पुरस्कारांमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल” असं मत संजय भाटिया यांनी व्यक्त केलं. इंडियन मरीन इंडस्ट्रीला भरीव योगदान देणाऱ्या लोकांचा गौरव करण्यासाठी ‘भांडारकर पब्लिकेशन’ने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी संजय सेठी यांनी वाधवण बंदराविषयी बोलताना या बंदराचे देशासाठी त्याचे महत्त्व आणि त्याच्या विकासाच्या टप्प्यावर प्रकाश टाकला.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 21 December 2021 -TV9 pic.twitter.com/8tDoPItsB1
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2021
संबंधित बातम्या:
चंद्रकांत पाटलांचं राष्ट्रपती राजवटीबाबत वक्तव्य, अजित पवार म्हणतात, धन्य आहोत!
Winter Session : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, अजितदादांकडून भाजपला चिमटा