मुंबई : राज्यात सध्या विदर्भासह काही भागांत मुसळधार पाऊस जोरदार तडाखा देत असतानाच हवामान खात्याने चक्रीवादळाचा अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळाचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होऊन राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भूते यांनी आज ही माहिती देत सावधानतेचा इशारा दिला आहे. राज्यात चक्रीवादळ धडकणार नसले तरी वाऱ्यांचा वेग अधिक असेल व पावसाचा मोठा तडाखा बसू शकतो, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे सप्टेंबर संपता संपताच पाऊस पुन्हा राज्यात जनजीवन विस्कळीत करणार असल्याची चिन्हे आहेत. (A cyclone over the Bay of Bengal; Alert to Maharashtra too)
बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. उद्या संध्याकाळी 26 तारखेला ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बघायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच इंडिरियरमध्ये वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये 26, 27, 28 सप्टेंबरला वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा मुख्य परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि कोकणामध्ये याचा परिणाम अधइक दिसण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भूते यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यात गेले 25 दिवस झाले सतत पाऊस पडतोय, त्यामुळे जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे संकट आहे. सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक धोक्यात गेले आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून असल्याने उभ्या सोयाबीन पिकाला बुरशी लागली आहे, तसेच पीके काळी पडायला लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता प्रचंड वाढली आहे. नागपूर जिल्ह्यासह विदर्भाच्या अनेक भागात ओल्या दुष्काळामुळे सोयाबीनचं सर्वाधिक नुकसान झाले आहे. सोयाबीनचे एकरी 40 ते 50 हजारांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. (A cyclone over the Bay of Bengal; Alert to Maharashtra too)
VIDEO: भाजप खासदाराला काँग्रेस कार्यकर्त्यांची पाठलाग करून मारहाण, रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्या घातल्या; उत्तर प्रदेशात खळबळhttps://t.co/3DqTbh6qou#bjp | #sangamlalgupta | #up | #congress
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2021
इतर बातम्या
महापालिका प्रभाग रचनेत पुन्हा बदलाची शक्यता! बाळासाहेब थोरात काय म्हणाले?