मुंबई, दि. 10 फेब्रुवारी 2024 | शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकावर अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी मुंबईतील दहिसरमध्ये हत्या झाली. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. त्यानंतर अचनाक मॉरिस याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. आता या प्रकरणात मॉरिस नरोन्हा याची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये पुप्षा चित्रपटातील डॉयलॉग वापरण्यात आला आहे. यामुळे या पोस्टचे संकेत कोणासाठी होते, ही चर्चाही रंगली आहे.
मॉरिस याच्या इन्सटाग्रामवर अकाउंटवर दहा दिवसांपूर्वी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉग देत एक पोस्ट टाकली गेली आहे. त्यात मॉरिस याचा फोटो आणि ऑडिया क्लिप आहे. त्यात म्हटले आहे की, पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझी क्या? फायर हूँ मै… ही पोस्ट चर्चेत आली आहे. मॉरिस याने या चित्रपटातील डॉयलॉग वापर स्वत:ला फायर म्हटले आहे. यामुळे दहा दिवसांपूर्वीच त्याने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा कट रचला की काय? ही चर्चा सुरु झाली आहे.
मॉरिस याने फेसबूक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्याने मॉरिसने सुरक्षा रक्षक असलेल्या अमरेंद्र मिश्रा यांची बंदूक मिळवली होती. मिश्रा यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून पिस्तूलचा परवाना मिळवला होता. परंतु त्याची नोंद केली नाही. यामुळे मिश्रा यांनाही अटक करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी मॉरसने मिश्रा याला त्याचा पीए मेहुल पारखे सोबत पाठवून दिले होते.
अभिषेक घोसाळकर याला सोडणार नाही, त्याला संपवणार आहे, असे मॉरिस सातत्याने बोलत होता. त्याच्या पत्नीने ही माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु आहे. आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा