मुंबई, दि. 9 फेब्रुवारी 2024 | शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकावर अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी हत्या झाली. मुंबईतील दहीसरमध्ये अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई सोबतच फेसबुक लाईव्ह करत होते. त्यानंतर मॉरिस भाई याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणात मॉरिस भाई याच्याकडे पिस्तूल कुठून आले? हा सर्वात महत्वाचा विषय आहे. हे पिस्तूल बेकायदेशीर असल्याची माहिती पोलिसांच्या तपासानंतर समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले होते. हे दोन्ही जण घटनास्थळावर उपस्थित होते.
माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर आहेत. ते मुंबईतल्या दहीसरमधील कांदरपाडा प्रभागात नगरसेवक होते. आता त्यांच्या पत्नी तेजस्विनी नगरसेविका आहेत. मॉरिस नरोना ऊर्फ मॉरिस भाई याचे आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात वाद होता. हा वाद मिटला असल्याचे जाहीर करत फेसबूक लाईव्ह त्यांनी सुरु केला. हे लाईव्ह सुरु असताना मॉरिस भाई यांनी अभिषेक याच्यावर गोळीबार केला. या घटनेशी संबंधित दोघांना ताब्यात घेतले गेले आहे. ते त्यावेळी घटनास्थळी असल्याचे म्हटले जात आहे. रोहित साहू आणि मेहुल पारेख असे दोघांची नावे आहेत.
फेसबूक लाईव्ह सुरु असताना गोळीबारापूर्वी मॉरिस बोलत होता. त्यावेळी त्याने मेहुल इज हिअर, असे म्हटले होते. त्यामुळे हा मेहुल कोण? त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला. गोळीबार झाल्यानंतर मेहुल पारेख घटनास्थळावरून फरार झाला. आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फेसबूक लाइव्ह सुरू असताना, मेहुल काय करत होता, त्याला मॉरिस याच्या कटाची माहिती होती का? या प्रश्नाची उत्तरे आता पोलीस चौकशीतून मिळणार आहे.
मॉरिस याने ज्या पिस्तूलमधून गोळीबार केले, ते पिस्तूल बेकायदेशीर आहे. त्याला हे पिस्तूल कुठून मिळाले, बेकायदेशीर पिस्तूल विकण्याचा उद्योग कोण चालवत आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा