व्हॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोना का होतो?; अदर पूनावाला यांनी दिलं ‘हे’ कारण

| Updated on: Apr 09, 2021 | 6:28 PM

व्हॅक्सीन टोचून घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. (Adar Poonawalla explanation on Oxford-AstraZeneca vaccine)

व्हॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोना का होतो?; अदर पूनावाला यांनी दिलं हे कारण
AADAR POONAWALA
Follow us on

मुंबई: व्हॅक्सीन टोचून घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या लसीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहे. नागरिकांमध्ये असलेला हा संभ्रम सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनीच दूर केला आहे. (Adar Poonawalla explanation on Oxford-AstraZeneca vaccine)

अदर पूनावाला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो? याचं उत्तर दिलं आहे. या कोरोना लसचे नाव कोविड शील्ड आहे. या शील्डमुळे तुम्हाला आजार होण्यापासून रोखलं जावू शकणार नाही, ही लस घेतल्यास कोरोनामुळे तुमचा मृत्यू होणार नाही. या लसीमुळे तुम्ही गंभीर आजारापासून वाचू शकाल. एवढेच नव्हे तर 95 टक्के केसेस मध्ये ही लस घेतल्यानंतर तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. ही लस एकप्रकारची बुलेट प्रुफ जॅकेट सारखी आहे. गोळी लागल्यानंतर बुलेट प्रुफ जॅकेटमुळे माणूस मरत नाही, मात्र तुम्हाला थोडं फार डॅमेज होतं. जानेवारीपासून आतापर्यंत 4 कोटी लोकांना डोस देण्यात आला आहे. हे लोक रुग्णालयात भरती आहेत का हे पाहवं लागणार आहे, असं पूनावाला म्हणाले.

शंभर टक्के काहीच अचूक नाही

या व्हॅक्सीनमुळे तुम्हाला आजारच होणार नाही, असं मी कधीच म्हटलेलं नाही. लोकांमध्ये कदाचित अशा प्रकारचा समज झाला असावा, त्याबाबत सांगता येत नाही. आज अनेक व्हॅक्सीन आहेत. त्या तुमचा संसर्ग होण्यापासून बचाव करत असतील. परंतु ही व्हॅक्सीन तुमची सुरक्षा करते. डब्ल्यूएचओनेही या व्हॅक्सीनचं कौतुक केलं आहे. त्यामुळेच सर्वांना लसीकरण करून घेण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. आज अनेक औषधे आहेत जे कधी काळी त्या त्या आजारावर उपयुक्त होते. परंतु आज ती औषधे निकामी ठरत आहेत. मानवाकडून तयार करण्यात आलेली कोणतीच गोष्ट शंभर टक्के योग्य असूच शकत नाही. अनेकदा अनेक गोष्टी काम करतात तर काही वेळा कामच करत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आधी नव्या लसची तपासणी तर होऊ द्या

एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सीनवर यूरोपातून प्रश्न केले गेले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या व्हॅक्सीनच्या क्लिनिकल ट्रायलच्या आधीच तिचे परिणाम आणि न्यूरॉलॉजिकल परिणामांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता ब्लड क्लॉटिंगचं प्रकरण समोर आलं आहे. परंतु, नियामक आणि व्हॅक्सीनची तपासणी करणाऱ्यांना त्याची तपासणी करू द्यावी, त्यानंतर कोणत्या तरी तर्कावर आलं पाहिजे. त्यासाठी थोडी कळ सोसली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

भारतात ब्लड क्लॉटिंग नाही

व्हॅक्सीनचे उलट परिणामही येत आहेत. पण त्यामागे काही कारणे आहेत. विनाकारण कोणतेही उलट परिणाम होत नसतात. ज्या वयाच्या लोकांना कोरोनाची व्हॅक्सीन दिली, त्यामध्ये ब्लड क्लॉटिंग होणं ही सामान्यबाब आहे. त्यामुळे यूरोपीयन देशातील नागरिकांमध्ये अचानक ब्लड क्लॉटिंगचं प्रमाण वाढलं का हे पाहिलं पाहिजे. परंतु, भारतात ब्लड क्लॉटिंगची एकही केस आढळली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

लसचा परिणाम

ज्या लोकांना कोरोना झाला आहे आणि जे रुग्णालयात भरती आहेत त्यांना कोविडशील्ड लस देण्यात आली. यात दोन किंवा तीन टक्के नव्हे तर 90 टक्क्याहून अधिक एफिकेसी दिसून आली आहे. तेही केवळ एकाच डोसने, असंही त्यांनी सांगितलं. (Adar Poonawalla explanation on Oxford-AstraZeneca vaccine)

लहान मुलांनाही लस देणार?

18 वर्षाखालील 12 वर्षापर्यंतच्या आणि त्याहून कमी वयाच्या मुलांना लस देण्याचा ट्रायल करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी आम्ही आतापर्यंत अर्ज केलेला नाही. अमेरिकेत ही ट्रायल सुरू आहे. अधिक काळजी घेऊन भारतातही हे करता येणं शक्य आहे. 12 किंवा 10 वयोगटातील मुलांसाठी ही लस सेफ आहे की नाही हे माहीत होण्यासाठी सहा महिन्याचा काळ जाऊ शकतो. परंतु, लहान मुलांची इम्यून सिस्टिम वेगळी असते हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कोणत्याही मुलाच्या जीवाशी आपण खेळू शकत नाही. त्यामुळे त्यांना देण्यात येणारे डोस आणि त्याच्या मात्रेवरही लक्ष दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले. (Adar Poonawalla explanation on Oxford-AstraZeneca vaccine)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार?

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांनी बाह्या सरसावल्या, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांना पुन्हा बोलावलं, कडक लॉकडाऊनची शक्यता

आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या; मोदींचा उद्धव ठाकरेंना दिलासा

(Adar Poonawalla explanation on Oxford-AstraZeneca vaccine)