“राज्यात रावण राज्य चालवून हे अयोध्येला चाललेत”; विरोधकांचा हल्ला, त्यावर सत्ताधाऱ्यांचाही प्रतिहल्ला…

| Updated on: Apr 08, 2023 | 5:54 PM

राज्यात कोरोनाचे संकट असताना, शेतकरी अवकाळी पावसाच्या अडचणीत सापडलेले असतानाच सत्ताधारी दौऱ्यावर जाऊन फक्त दिखाऊपणाचे राजकारण करायचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राज्यात रावण राज्य चालवून हे अयोध्येला चाललेत; विरोधकांचा हल्ला, त्यावर सत्ताधाऱ्यांचाही प्रतिहल्ला...
Follow us on

मुंबई : राज्यातील राजकारण सध्या प्रचंड तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांची जोरदार जुंपली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि त्यांचे मंत्री, आमदार हे फक्त दिखाऊगिरीसाठी अयोध्या दौरा करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. विरोधकांच्या या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी तेवढ्याच जोरदारपणे प्रतिहल्ला केला आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्यावरून तापलेले राजकारण आता कधी थंड होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

खासदार संजय राऊत यांनी अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर टीका करताना हे फक्त दिखाऊपणासाठी अयोध्या दौरा करत आहेत.

तर अजित पवार यांनीही या दौऱ्यावरून टीकास्त्र सोडल्यावर शंभूराज देसाई यांनी सांगितले की, अजित पवार कधी गेले होते, अयोध्येला. त्यामुळे त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदारआदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, राज्यात रावण राज्य चालवून हे अयोध्येला चालले आहेत अशी जहरी टीका त्यांनी केली होती. त्यावर शिंदे गटानेही त्यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्याकडे आता टीका करण्याशिवाय काही एक पर्याय उरलेला नाही. त्यामुळे त्यांच्या या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अयोध्या दौऱ्यावर आरोप-प्रत्यारोप केले जात होते. त्यातच आज एकनाथ शिंदे दौऱ्यावर गेल्यानंतर मात्र विरोधकांनी त्यांच्यावर आता जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यात कोरोनाचे संकट असताना, शेतकरी अवकाळी पावसाच्या अडचणीत सापडलेले असतानाच सत्ताधारी दौऱ्यावर जाऊन फक्त दिखाऊपणाचे राजकारण करायचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.