आदित्य ठाकरे लोकसभा लढवणार? थेट हा मतदार संघ निवडल्यावर कोणी दिले आव्हान

| Updated on: Dec 18, 2023 | 12:27 PM

aditya thackeray and shrikant shinde | ज्याला पण इथून उभे राहायचे त्यांनी राहावे, स्पर्धा ही झाली पाहिजे. त्यासाठी विरोधक पण चांगला असावा. तरच लढाईला मजा येईल, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना देण्यात आले. विद्यामान खासदार श्रीकांत ठाकरे यांनी हे आव्हान दिले.

आदित्य ठाकरे लोकसभा लढवणार? थेट हा मतदार संघ निवडल्यावर कोणी दिले आव्हान
Follow us on

सुनिल जाधव, ठाणे, दि.18 डिसेंबर | कल्याण लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. यातच खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत आदित्य ठाकरे यांना टोला लगावत आवाहन केले आहे. डोंबिवली आगरी महोत्सव कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांही आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करताना त्यांनी स्वप्न पाहण्यात गैर नाही. ज्याला पण इथून उभे राहायचे त्यांनी राहावे, स्पर्धा ही झाली पाहिजे. त्यासाठी विरोधक पण चांगला असावा. तरच लढाईला मजा येईल. ज्याला या ठिकाणी उभे राहायचे आहे त्यांनी आधी ठरवावे ते वरळीतून उभे राहणार ठाण्यातून की कल्याणमधून, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

आता मुख्यमंत्री डीप क्लिनिंग करताय

खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष केले आहे.डोंबिवलीत आयोजित आगरी महोत्सव कार्यक्रमादरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे वर नाव न घेता टीका केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, मुंबईची साफसफाई जी गेले अनेक वर्ष झाली नव्हती ती साफसफाई मुख्यमंत्री करत आहे. त्याला डीप क्लिनिंग नाव दिलेल आहे. खरंच खूप गाळ या मुंबईमध्ये साचला होता. त्याला साफ करायची खूप गरज होती. ती साफ करण्याचे काम जे आहे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी येऊन ते हे काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांबरोबर सगळी जनता साफसफाईमध्ये सामील होईल आणि मुंबई एकदम आणि क्लिन चकाचक होईल. मुंबईमध्ये फक्त विकासाचे राजकारण होईल. लोकांना जे आवश्यक आहे, ते या मुंबईमध्ये उभा राहील, असे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

राजू पाटील यांना दिले उत्तर

मनसे राजू पाटील यांनी इथल्या लोकप्रतिनिधी बद्दल सर्वसामान्यांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये रोष, त्यांना बदल हवा आहे, असं वक्तव्य करत अप्रत्यक्षरित्या श्रीकांत शिंदे यांना लक्ष केलं होतं .याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी माणूस जितकी कामे करतो तितकीच त्याच्यावर टीका होत असते. म्हणूनच आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही तर दिवसरात्र लोकांची कामे करतो. कल्याण डोंबिवलीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हर उभारणे हे आपले ध्येय असून कोणती कामे केलीत कोणती कामे सुरू आहेत आणि कोणती होणार आहेत हे मी छाती ठोक पणे सांगू शकतो. मात्र विरोधकांची तितकी हिंमत नाही. कारण त्यांच्याकडे छातीठोक पणे सांगण्यासारखी कामेच नाहीत. विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काही दुसरे काम नाही म्हणूनच मी त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नाही, असा टोला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अप्रत्यक्ष रित्या मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह विरोधकांना लगावला.