मुंबई: लालबागचा राजा मंदिर परिसरात पत्रकारांना पोलीस इन्स्पेक्टर संजय निकम यांनी केलेल्या धक्काबुक्कीचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. निकम यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे. (adv. gunratna sadavarte reaction on Mumbai police pushes journalist in Lalbaug area)
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे. स्वत: सदावर्ते यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही माहिती दिली. बॉम्बे पोलीस मॅन्यूअल, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि बॉम्बे पोलीस अॅक्ट या तीन संहितेत दर्शविल्याप्रमाणे संजय निकम यांचं वर्तन अभिप्रेत नाही. त्यामुळे गैरवर्तन करणाऱ्या अशा अधिकाऱ्याला प्राथमिक दृष्ट्या वळसे पाटलांनी तातडीने निलंबित केलं पाहिजे. तसेच मुख्य सचिवांनी नियमानुसार या प्रकरणाची चौकशी समिती नेमली पाहिजे. त्यानंतर पुढील कारवाई केली पाहिजे, असं सदावर्ते यांनी सांगितलं.
धक्काबुक्की केली आणि अर्वाच्य भाषेत धमकावल्याची पत्रकारांनी तक्रार केली असेल निकम यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर कोडखाली कारवाई केली पाहिजे. भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली सुद्धा त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला पाहिजे. अशा प्रकारची गुंडगिरी आणि असंविधानिक वर्तन अभिप्रेत नाही. त्यामुळे सरकार कुणाची वाट पाहत आहे?, असा सवाल करतानाच आम्ही तक्रार केली आहे. आम्ही सरकार आणि पोलिस आयुक्तांना आवाहन करतो की, असं वर्तन अभिप्रेत नसताना तुम्ही कारवाईसाठी कशाची वाट पाहत आहात? तातडीने निकम यांना पदावरून मुक्त केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
लालबाग परिसरात पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी एखाद्या गुंडाप्रमाणे पोलिसांशी अरेरावी केली. स्वत: मास्क न घालता संजय निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. मीडियाकर्मींनी पोलीस निरीक्षक संजय निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांना पारा आणखी चढला. धक्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं बजावलं. त्यावेळी या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब अशी गुंडगिरीची भाषा केली. पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायदा राखणाऱ्यांनी अरेरावी केली तर विचारायचं कुणाला हा प्रश्न सर्वसामान्यांना आहे. याप्रकरणाचा आम्ही निषेध करतो, झाल्याप्रकाराची चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करावी, मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावं अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
लालबागचा राजा गणपतीचं कव्हरेज करण्यासाठी पत्रकार जमले होते. या पत्रकारांकडे अधिकृत प्रवेशाचे पास होते. चार दिवसापूर्वी सर्वांना हे पास देण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पास दाखवून प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावेळी PI संजय निकम यांनी अरेरावी करण्यास सुरुवात केली. प्रवेश देणार नाही, इथून दोन मिनिटात बाहेर पडा, असं म्हणत संजय निकम यांनी थेट पत्रकारांशी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारांनी संजय निकम यांनी समजुतीने घेण्यास सांगितलं. तरीही संजय निकम यांनी धक्काबुक्की चालूच ठेवली. त्यावेळी संजय निकम यांना हात लावू नका, धक्काबुक्की करु नका असं सांगितलं. त्यावेळी संजय निकम म्हणाले, हात काय, पाय सुद्धा लावू शकतो, असं म्हणत पत्रकाराला काठी दाखवली.
लालबागच्या कव्हरेजसाठी आम्ही सगळ्यानी नियमानुसार पास काढले होते. पण पास असूनही सकाळपासून पोलिसांनी एन्ट्री दिली नाही. तरीही आम्ही अधिकाऱ्यांशी विनंती करून आतमध्ये जाण्याच्या प्रयत्न करत होतो. पण पोलीस निरीक्षक संजय निकम आमच्यावर अरेरावी करायला लागले. त्यांनी धक्के देऊन बाहेर काढायला सुरुवात केली. सकाळपासून आम्ही गेटवर उभे आहोत. त्यांचं बोलणं योग्य नाही. आम्ही फक्त त्यांना एवढंच म्हटलं की, सर आम्ही तुमच्याशी प्रेमाने बोलतोय तुम्हीही आमच्याशी प्रेमाने बोला, तरीही अशा प्रकारची वागणूक आम्हाला देण्यात अशी अशी प्रतिक्रिया पत्रकार अभिषेक मुठाळ यांनी दिलीय. (adv. gunratna sadavarte reaction on Mumbai police pushes journalist in Lalbaug area)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 10 September 2021https://t.co/Ha7WGja4QD
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2021
संबंधित बातम्या:
Video : PI संजय निकम यांची दादागिरी, लालबागच्या दरबारात म्हणतात, हात काय, पाय सुद्धा लावून दाखवतो!
(adv. gunratna sadavarte reaction on Mumbai police pushes journalist in Lalbaug area)